डुकरे पकडण्यासाठी अधिकारी रस्त्यावर

Pig
Pig

पुणे - डुकरे पकडण्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही त्यांचा उपद्रव कमी होत नसल्याने त्यांच्या बंदोबस्तासाठी आता महापालिका प्रशासनाने अधिकाऱ्यांच रस्त्यांवर उतरविले आहे. अतिक्रमण खात्यातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना ही जबाबदारी देण्यात आली असून, त्यासाठी त्यांना रोजचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. दिवसभर गल्लीबोळात फिरून या पथकांच्या हाती एकही डुकर लागत नाही. मात्र, आयुक्तांचा आदेश म्हणून ही पथके फिरतीच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. 

शहरातील काही भाग आणि उपनगरांमध्ये जवळपास २५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना डुकरे पकडण्याची कामे दिली आहे. दुसरीकडे मात्र गेल्या आठवडाभरात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी डुकरे पकडण्यात आली आहेत. तरीही अतिक्रमण निरीक्षक आणि या खात्यातील कामगारांना मूळ कामाऐवजी इतरत्रच फिरविण्यात येत आहे. डुकरांचा उपद्रव रोखण्यासाठी ठेकेदाराच्या माध्यमातून ती पकडण्यात येत आहेत. यासाठी आतापर्यंत सव्वाकोटी रुपयांची तरतूद केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करूनही त्याचा फायदा झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर मोकट किंवा भटकी डुकरे दिसल्यास त्यांना तातडीने ताब्यात घेण्याचा आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे. त्यासाठी महापालिका अधिनियमातील तरतुदींचा आधार घेत गेल्या दहा दिवसांपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

अतिक्रमणे वाढण्याची शक्‍यता
डुकरे पकडण्याच्या कामासाठी ठेकेदाराला लाखो रुपये मोजल्यानंतरही कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुन्हा तीच कामे दिली जात आहेत. आधीच अपुरे मनुष्यबळ असतानाच अतिक्रमण खात्यातील कामगारांना या मोहिमेसाठी पाठविले जात आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवात रस्त्यांवर अतिक्रमणे वाढण्याची शक्‍यता आहे.

क्षेत्रीय कार्यालयांकडील काही कंत्राटी कामगारांना डुकरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र डुकरे पकडण्यासाठी वेगळी यंत्रणा आहे; परंतु अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. सर्व भागांत ती करण्यात येत आहे.
- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com