पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवक सहकारी पतसंस्थेची सभा उत्साहात

मिलिंद संधान
बुधवार, 30 मे 2018

नवी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच भोसरी येथील कै अंकुशराव लांडगे नाट्यगृहात पार पडली. यावेळी सभेचे अध्यक्ष म्हणून आबा विठोबा गोरे यांनी काम पाहिले. यावेळी पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे यांनी संस्थेचा व कर्मचारी महासंघाचा अहवाल तसेच विषय पत्रिकेचे वाचन केले. त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.  

पतसंस्थेचे एकून पाचहजारांपेक्षा अधिक सभासद असून वार्षिक उलाढाल ऐकशे बेचाळीस कोटी पेक्षा अधिक आहे. सभासदांनी बावण्ण कोटीच्या ठेवी ठेवल्या असून भागभांडवल एक्कावण्ण कोटी इतके आहे. चालु वर्षात साडेनऊ कोटी निव्वळ नफा झाला असून सभासदांना अकरा टक्के लाभांश देण्यात आला आहे. पतसंस्थेला सतत अ वर्ग असून बडीत कर्ज शून्य आहे.

पतसंस्थेने महाराष्ट्र शासणाचे स्वस्त दरात दोन ते पाच किलो तुरडाळ सभासदांना शेअर्सच्या प्रमाणात वाटप करण्याचा निर्णय घेतला तर श्री मारूती देव व चिलाई ट्रस्ट, जांब , ता. वाई जिल्हा सातारा यांना पिण्याच्या पाण्यासाठी गावालगत ओढ्यावर बंधारा बांधण्यासाठी रूपये एक लाखाची मदत करण्यात आली. 

यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे यांच्याहस्ते सेवानिवृत्त सभासद, गुणवंत विद्यार्थी व खेळाडुंना गौरविण्यात आले. संस्थेचे संचालक संजय कुटे, सीमा अनिल सुकाळे, महाद्रंग वाघेरे, अंबर चिंचवडे, मनोज प्रितमसिंग माछरे, मधुकर रणपिसे, राजाराम चिंचवडे, सतिश गव्हाणे, नाथा मातेरे, रमेश चोरघे, भगवान मोरे, चारूशिला जोशी, महादेव बोत्रे, दिलिप गुंजाळ, यशवंत देसाई, नंदकुमार घुले व व्यवस्थापक नंदकुमार कोंढाळकर यांच्यासह इतरही संचालक उपस्थित होते. 

Web Title: pimpari chinchwad municipal corporation cooperation organisation meeting