पिंपरी-चिंचवड कार्यालयाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात

pcmc-sakal-office
pcmc-sakal-office

पिंपरी -  वाचकांशी असलेले वर्षानुवर्षांचे ऋणानुबंधाचे नाते दृढ करीत वाचकांच्या साक्षीने "सकाळ'च्या पिंपरी-चिंचवड विभागाने बुधवारी (ता. 30) रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. सनई-चौघड्याचा मंगलमय सूर...आकर्षक सजावट...विद्युत रोषणाई... रांगोळ्या..."सकाळ'ची यशस्वी वाटचाल सांगणारे बॅनर्स..., अशा चैतन्यदायी वातावरणात प्रेम, स्नेह आणि आपुलकीच्या रेशीम धाग्यांनी गुंफलेली गप्पांची मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या प्रांगणातील या स्नेहमेळाव्यास आवर्जून उपस्थित राहत सर्वसामान्य वाचकांपासून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी "सकाळ परिवारा'ला भरभरून शुभेच्छा दिल्या. "वर्धापन दिना'निमित्त प्रसिद्ध केलेल्या बहुरंगी, बहुपानी विशेष पुरवण्यांचे वाचकांनी तोंडभरून कौतुकही केले.

स्नेहमेळाव्याचे औचित्य साधत कॉफीचा आस्वाद घेत सायंकाळी सहा वाजता गप्पांची मैफल सुरू झाली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह शेकडो वाचकांची पावले कार्यक्रमस्थळी वळली. बघता बघता प्रेक्षागृहाचे प्रांगण उपस्थितांच्या गर्दीने फुलून गेले. गप्पा, चर्चा, अभीष्टचिंतनाने कार्यक्रमाला विशेष गोडी आणली.

"सकाळ' समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, "सकाळ'चे विशेष अधिकारी अरविंद सुर्वे, मुख्य संपादक श्रीराम पवार, कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, जाहिरात विभाग सरव्यवस्थापक राकेश मल्होत्रा, "सकाळ'चे (टेक्‍नॉलॉजी) संचालक भाऊसाहेब पाटील, सहयोगी संपादक अविनाश चिलेकर, मुख्य वार्ताहर मिलिंद वैद्य यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि शुभेच्छांचा स्वीकार केला.

महापौर शकुंतला धराडे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार बाळा भेगडे, आमदार गौतम चाबुकस्वार, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे सभापती डब्बू आसवानी, विरोधी पक्षनेते राहुल भोसले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे, गटनेत्या सुलभा उबाळे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, कैलास जाधव, रिपब्लिकन (आठवले गट) पक्षाच्या प्रमुख चंद्रकांता सोनकांबळे, शिक्षण मंडळाचे सभापती निवृत्ती शिंदे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष पी. डी. पाटील, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके, "एटीएस'चे सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. जय जाधव यांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली.
वितरण विभाग मुख्य व्यवस्थापक अब्दुल अजीज, वरिष्ठ व्यवस्थापक मिलिंद भुजबळ (जाहिरात), वितरण व्यवस्थापक अभय नरवडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com