'पिंपरी आयुक्तालयाला आळंदी जोडणार'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

आळंदी - ‘‘आळंदीत शहरीकरणामुळे गुन्हे आणि वाहतूक समस्या वाढली असून, पोलिसांची संख्या कमी असल्याने येथे जादा पोलिस बळ पुरविणे शक्‍य नाही. आता आळंदी शहर पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयाशी जोडण्यात येईल,’’ असे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी सांगितले. 

आळंदी - ‘‘आळंदीत शहरीकरणामुळे गुन्हे आणि वाहतूक समस्या वाढली असून, पोलिसांची संख्या कमी असल्याने येथे जादा पोलिस बळ पुरविणे शक्‍य नाही. आता आळंदी शहर पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयाशी जोडण्यात येईल,’’ असे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी सांगितले. 

 आळंदी पोलिस ठाण्याची तपासणी आणि शहरातील प्रतिष्ठित, राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधण्याच्या निमित्ताने नांगरे पाटील बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, खेड पोलिस उपविभागीय अधिकारी राम पठारे, सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील उपस्थित होते. नांगरे  म्हणाले, ‘‘महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी निर्भयासारखे प्रयोग केले. निर्भया पथकांना स्वतंत्र वाहन देऊन जादा कर्मचारी दिले जातील. यामुळे शाळा परिसरात खासगी वेशातील पोलिसांचा दरारा राहील.’’

आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहा पालिका आणि बावीस सीसीटीव्ही लोकसहभागातून बसविण्यात आले. यामुळे शहरातील गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. आळंदी पोलिसांनी केलेल्या या कामगिरीची दखल घेत नांगरे पाटील यांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

...तर ‘संस्कार’वर कारवाई 
अल्पवयीन मुलामुलींची लग्न लावणाऱ्या आणि रस्त्यांवर बेकायदा पार्किंग करणाऱ्या मंगल कार्यालयांचे ऑडिट करा तसेच डिजिटल बोर्ड आणि फ्लेक्‍स उभारण्यास शंभर टक्के बंदी करा अशी सूचना करत संस्कार ग्रुपच्या माध्यमातून बचत गटातील महिलांच्या फसवणुकीच्या तक्रारी आल्यास संचालकांवर कारवाई करण्याचा आदेशही 
त्यांनी दिला. 

‘टॉप टेन गुंडांचा अभ्यास करणार’
गुंडांच्या बाबतीत वेगळी आचारसंहिता करून आता टॉप टेन गुंडांचा अभ्यास करून त्यानुसार कारवाई केली जाईल. औद्योगिक भागात सुरक्षिततेसाठी कॅमेरे अधिक लावण्यासाठी प्रवृत्त करू. महिला, विद्यार्थिनींच्या छेडछाडी रोखण्यासाठी प्रयत्न करू. पोलिस दलात तीस टक्के महिलांची नियुक्ती केल्याने महिलांनी निर्भयपणे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन नांगरे यांनी केले.

Web Title: Pimpri Commission to joint Alandi