बारावीचा निकाल 93.34 टक्‍के 

बारावीचा निकाल 93.34 टक्‍के 

पिंपरी - शास्त्र शाखेत शिक्षण घेणे अवघड मानले जाते. मात्र, पिंपरी-चिंचवड शहर त्याला अपवाद ठरले आहे. शहरात बारावीच्या परीक्षेत शास्त्र शाखेत शिकणारी मुले हुशार निघाली आहेत. शहरातील ३१ महाविद्यालयांचा शास्त्र शाखेचा निकाल १०० टक्‍के लागला आहे. 

महाराष्ट्राच्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत शहरातून ९३.३४ टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. शहरात वाणिज्य शाखेच्या ११, तर कला शाखेच्या अवघ्या दोन महाविद्यालयांचा निकाल १०० टक्‍के लागला आहे. 

मार्च महिन्यात झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी शहरातून १५ हजार ४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ हजार ३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये एक हजार ८२२ विद्यार्थी डिस्टिंक्‍शनमध्ये पाच हजार ५८५ प्रथम श्रेणीत, सहा हजार द्वितीय श्रेणीत आणि ६२७ तिसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.७९ टक्‍के असून, मुलींचे प्रमाण ९४.५८ टक्‍के आहे. 

पिंपरीमधील जयहिंद हायस्कूल अँड कनिष्ठ महाविद्यालय, निगडीमधील अमृता कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डीमधील सेंट उर्सुला स्कूल, निगडीमधील सरस्वती विश्‍व विद्यालय, रहाटणीमधील एसएनबीपी कनिष्ठ महाविद्यालय, बोराडेवाडीमधील युनिव्हर्सल कनिष्ठ महाविद्यालय, निर्मल बेठानी हायस्कूल या सात महाविद्यालयांतील शास्त्र आणि वाणिज्य या दोन्ही शाखांचे निकाल १०० टक्‍के लागले आहेत. 

बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सकाळपासूनच निकालाची उत्सुकता दिसत होती. काही जणांनी नेट कॅफेमध्ये जाऊन तर काहींनी आपल्या स्मार्टफोनवर निकाल पाहण्यास पसंती दिली. 

शास्त्र शाखेचा शंभर टक्‍के निकाल लागलेली महाविद्यालये-
एस. एफ. जैन विद्यालय (चिंचवड), श्रीमती गोदावरी सेकंडरी स्कूल (चिंचवड), भारतीय जैन संघटना हायस्कूल (पिंपरी), कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे प्रेरणा कनिष्ठ विद्यालय (निगडी), श्री स्वामी समर्थ कनिष्ठ महाविद्यालय (भोसरी), के. जी. गुप्ता कनिष्ठ महाविद्यालय (चिंचवड स्टेशन), मॉडर्न हायस्कूल (यमुनानगर), श्रीमती संजूबेन एस. अजमेरा हायस्कूल (पिंपरी), डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (शाहूनगर, चिंचवड), शिवभूमी विद्या सेंटर (यमुनानगर, निगडी), कै. नागनाथ मारुती गडसिंग कनिष्ठ महाविद्यालय (चिंचवड), एसएनबीपी कनिष्ठ महाविद्यालय (पिंपरी), कमलनयन बजाज कनिष्ठ महाविद्यालय (चिंचवड), सरस्वती इंग्लिश मीडियम हायस्कूल (कुदळेवाडी), संचेती कनिष्ठ महाविद्यालय (चिंचवड), प्रियदर्शनी कनिष्ठ महाविद्यालय (भोसरी), अनुसया वाढोवकर हायस्कूल (चिंचवड), होरायझन इंग्लिश मीडियम स्कूल (दिघी), पी. बी. जोग हायस्कूल (चिंचवड), गीतामाता कनिष्ठ महाविद्यालय (एमआयडीसी), एस. बी. पाटील महाविद्यालय (रावेत), किलबिल हायस्कूल (पिंपळे गुरव), नोव्हल कनिष्ठ महाविद्यालय (चिंचवड), क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल (आकुर्डी), एसएनबीपी कनिष्ठ महाविद्यालय (चिखली).


वाणिज्यचा 100 टक्‍के निकाल
शिवभूमी विद्या सेंटर (यमुनानगर, चिंचवड), सिटी प्राइड कनिष्ठ महाविद्यालय (निगडी), नृसिंह हायस्कूल (सांगवी), सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालय (रावेत).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com