घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या दोन टोळ्या चिंचवड पोलिसांनी केल्या गजाआड 

रविंद्र जगधने
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पिंपरी - शहरासह उपनगरात घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या दोन टोळ्या चिंचवड पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत जेरबंद केल्या. त्यांच्याकडून एकूण 16 गुन्हे उघडकीस आले असून 19 लाख एक हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अशी माहिती उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

पिंपरी - शहरासह उपनगरात घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या दोन टोळ्या चिंचवड पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत जेरबंद केल्या. त्यांच्याकडून एकूण 16 गुन्हे उघडकीस आले असून 19 लाख एक हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अशी माहिती उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

पहिल्या कारवाईत वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे व निरीक्षक (गुन्हे) विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक सतीश कांबळे, पोलिस नाईक स्वप्नील शेलार, शिपाई विजयकुमार आखाडे यांनी संशयित गुन्हेगार गणेश दगडू शिंदे (वय 24, रा. मुळशी), दिलीप ऊर्फ अजय दुर्गेश शिकरे (वय 19, रा. कामशेत), रोहिदास ऊर्फ काश्‍या संभाजी पवार (वय 24, रा. शिवणे, ता. मावळ) आणि प्रमोद रामा शिरसागर (वय 36, रा. लोणावळा) या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून 19 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, एक फियाट पुंन्टो कार, 57 हजारांची रोकड, एक मोटारसायकल, आणि दोन मोबाईल असा 16 लाख 43 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच त्यातील गणेश शिंदे हा सराईत गुन्हेगार आहे. 

दुसऱ्या कारवाईत तपास पथकाचे उपनिरीक्षक सुभाष ढिगे, हवालदार अशोक आटोळे, नाईक सुधाकर आवताडे यांनी संशयित गुन्हेगार नितीन हरी वेताळ (वय 18, रा. पर्वतीपायथा, पुणे) आणि आकाश विठ्ठल जगताप (वय 18, रा. निगडी) यांनी अटक करत त्यांच्याकडून पाच दुचाकी, एक एलईडी टीव्ही व लॅपटॉप, दहा ग्रॅम सोन्याची अंगठी, एक मोबाईल असा दोन लाख 58 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. या दोन्ही कारवाईत एकूण 19 हजार, एक हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. 

ही कारवाई उत्तर विभागाचे अपर पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे, परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त राम मांडूरके, वरिष्ठ निरिक्षक विठ्ठल कुबडे, निरिक्षक (गुन्हे) विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक सतीश कांबळे, पोलिस उपनिरिक्षक सुभाष डीगे, अशोक आटोळे, पोलिस नाईक स्वप्निल शेलार, सुधाकर आवताडे, विजयकुमार आखाडे, चंद्रकांत गडदे, ऋृषिकेश पाटील, राहुल मिसाळ, सचिन वर्णेकर, अमोल माने, गोविंद डोके, पंकज भदाणे, नितीन राठोड, महिला पोलिस नाईक रूपाली पुरीगोसावी, कांचन घवले यांनी ही कामगिरी केली.