फायर ब्रिगेड हवे अलर्ट

फायर ब्रिगेड हवे अलर्ट

पिंपरी - शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे तळेगाव, चाकण ही शहरे पिंपरी-चिंचवडला जोडली गेली आहेत. टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत; मात्र सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशामक दलाचे सक्षमीकरण झालेले नाही. त्यामुळे अनेकदा अग्निशामक दलाचे बंब आगीच्या ठिकाणी पोचायला उशीर होतो. यावर पर्याय म्हणजे मध्यवस्तीतील अग्निशमन केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे; मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधींनी याकडे कायमच दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

शहरात १४८ रसायन कंपन्या  
साई इंडस्ट्रीज कंपनीला २००८ मध्ये आग लागली होती. त्यानंतर सर्व्हेक्षण केल्यानंतर १२५ छोट्या केमिकल कंपन्या, १५ मध्यम रसायन कंपन्या आणि आठ मोठ्या रसायन कंपन्या शहरात असल्याचे दिसून आले.

एमआयडीसी अग्निशामक क्षमता
हिंजवडी फेज-२ : दोन बंब, चाकण : दोन बंब, तळेगाव : एक बंब. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात १४८ रसायन कंपन्या असून, एमआयडीसीचे एकही अग्निशमन केंद्र नाही.

‘एमआयडीसी’ केंद्राची गरज
शहरातील एमआयडीसीमध्ये १४८ रसायन कंपन्या आहेत. एफ-२ ब्लॉकमध्ये एमआयडीसीचा एक एकराचा भूखंड आहे. त्यावर अग्निशामक केंद्र न उभारता एमआयडीसीने ती जागा अग्निशामक केंद्राकरिता महापालिकेला दिली आहे. 

बंब उशिरा का पोचतात?
शहरातील एमआयडीसीत आग लागल्यास आणि वाहतूक कोंडी नसल्यास चाकण आणि हिंजवडी येथून अग्निशामक बंब वाहने शहरात येण्यासाठी साधारणत- २५ मिनिटे लागतात. तोपर्यंत रसायणाची आग किती उग्र स्वरूप धारण करू शकते, याचा अंदाज न केलेलाच बरा.

पालिका विभागाची क्षमता
 अग्निशामक केंद्र - संत तुकारामनगर, रहाटणी, प्राधिकरण, भोसरी, तळवडे
 वाहने - मोठे बंब १५, छोटे बंब : पाच, त्यापैकी एक : ५४ मीटर उंच.
 मनुष्यबळ : कर्मचारी : १४०, अधिकारी : ८
 खास उपकरणे - विषारी वायुकरिता श्‍वसन उपकरण, फ्लड लाइट, पत्रा, गज कापण्यासाठी हायड्रॉलिक यंत्रणा

प्रस्तावित फायर स्टेशन
चिखली, एमआयडीसी एफ-२ ब्लॉक, मोशी, चोविसावाडी, थेरगाव, चिंचवडगाव या ठिकाणी फायर स्टेशन उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे; मात्र येथील जागांसाठी भूमी जिंदगी विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद नाही.

अग्निशमन केंद्राची आवश्‍यकता
समाविष्ट गावांचा झपाट्याने विकास होत असल्याने पुनावळे, किवळे, ताथवडे, रावेत, वाकड, सांगवी, दापोडी, पिंपळे सौदागर या भागात अग्निशमन केंद्र उभारण्याची गरज आहे. 

मानांकानुसार किती क्षमता हवी
५० हजार लोकसंख्येला एक अग्निशमन केंद्र, याप्रमाणे तीन लाख लोकसंख्येला सहा अग्निशमन केंद्र हवीत. त्यानंतर प्रत्येकी एक लाख लोकसंख्येला प्रत्येकी एक याप्रमाणे शहरात आजमितीला २५ अग्निशमन केंद्र असायला हवी होती; मात्र प्रत्यक्षात पाचच अग्निशमन केंद्र आहेत.

यांचीही मिळते मदत
शहरात टाटा मोटर्स, सेंच्युरी एन्का, फोर्स मोटर्स, बजाज ऑटो या कंपन्यांचे स्वतंत्र अग्निशामक दल आहे. तसेच शहराच्या हद्दीबाहेरील चाकण येथील महेंद्र व्हेइकल, फोक्‍स वॅगन, पुणे अग्निशामक, हिंजवडी-चाकण-तळेगाव एमआयडीसी, खडकी कॅंटोंमेंट, पुणे कॅंटोन्मेंट, देहूरोड कॅंटोन्मेंट यांचीही मदत मिळते.

टॉवरची आग विझणार कशी?
शहरात ७० मीटर उंचीच्या इमारतींना बांधकाम परवानगी महापालिकेने दिली आहे; मात्र अग्निशामक दलाकडे फक्‍त ५४ मीटर उंचीचा बंब आहे. त्यामुळे ७० मीटर उंचीच्या इमारतीची आग विझणार कशी?

चिखली केंद्रासमोरील अडचणी
सर्वाधिक व मोठ्या आगीच्या घटना कुदळवाडी परिसरात घडतात. यामुळे चिखली परिसरात अग्निशमन केंद्राचे काम सुरू आहे; मात्र त्या ठिकाणी पाण्याची टाकी व अन्य सुविधा नसल्याने ते केंद्र सुरू करता येत नाही.

लोकसंख्या आणि परिसराचा विचार करता सध्याची यंत्रणा पुरेशी आहे; परंतु मनुष्यबळ आवश्‍यक आहे. मेट्रो, स्मार्ट सिटी, वाढत्या शहरीकरणामुळे अग्निशामक दलाचे आणखी सक्षमीकरण करणे गरजेचे आहे.
- किरण गावडे,  मुख्य अग्निशामक अधिकारी, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com