घर घेण्याची सुवर्णसंधी  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पो
कधी : २६ आणि २७ ऑगस्ट
कुठे : महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर परिसर
वेळ : सकाळी ११ ते रात्री ८
प्रवेश व पार्किंग मोफत

पुणे - प्रत्येकालाच घर घेण्याची इच्छा असते. मात्र इच्छा प्रत्यक्षात उतरण्यासाठी योग्य संधीची वाट पाहावी लागते. संधी कधी सांगून येत नाही; पण जेव्हा ‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पोचे आयोजन केले जाते, तेव्हा घराची संधी सांगून येते. येत्या शनिवारी (ता. २६) आणि रविवारी (ता. २७) ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’च्या माध्यमातून घर घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

कर्वेनगर परिसरातील महालक्ष्मी लॉन्स येथे हा एक्‍स्पो होणार असून, यामध्ये तीसहून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या आणि विकसकांच्या १६० पेक्षा जास्त  ‘महारेरा’ नोंदणीकृत गृहप्रकल्पांचा सहभाग असणार आहे. 

आपल्या सोयीनुसार घर हवे असणाऱ्या गृहखरेदीदारांसाठी अपेक्षित असलेल्या घराची संधी या एक्‍स्पोमधून हमखास साधता येईल. दोन दिवस चालणारा हा एक्‍स्पो सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला असून, या ठिकाणी बजेट होम्सपासून लक्‍झुरियस होम्सपर्यंत सर्व प्रकारच्या घरांची सविस्तर माहिती मिळणार आहे. 

टॅग्स