'लक्ष्मण जगताप यांना सत्तेची धुंदी'

'लक्ष्मण जगताप यांना सत्तेची धुंदी'

पिंपरी  - लोकसभा निवडणुकीला सव्वावर्षांपेक्षा जास्त कालावधी असताना केवळ आपली धास्ती घेतल्यामुळे लक्ष्मण जगताप उसने आव्हान देत आहेत; पण मला कोणाच्या फालतू आव्हानांची गरज नाही. माझ्या विरोधात काढलेले पत्रक म्हणजे त्यांचा बालिशपणा असून, त्यांना सत्तेची व पैशाची धुंदी आली असल्याची तिखट प्रतिक्रिया खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. 

"बारणे यांनी शिवसेनेकडून पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी', असे आव्हान भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतेच दिले होते. त्याला प्रत्युत्तर देताना बारणे यांनी ही खरमरीत टीका केली आहे. "बारणे उमेदवार असतील तरच मी लोकसभा लढणार' असे आव्हान जगताप यांनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी दिले होते. त्याची आठवण करून देत बारणे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्‍यांनी मी विजयी झालो. काल जगतापांनी मला पुन्हा आव्हान दिले, हा माझ्यासाठी शुभ शकुनच ठरेल.' 

माझ्या विरोधात लोकसभेला लढण्यापूर्वी जगताप यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचे नाटक करून त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकला. शेतकरी कामगार पक्षाच्या एकगठ्ठा मतावर डोळा ठेवून त्या पक्षात प्रवेश केला. उमेदवारी घेतली. साथीला मनसेचाही पाठिंबा घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सर्व फौज बरोबर घेतली, तरीदेखील जगताप यांना पावणेदोन लाखांनी पराभव पत्करावा लागला. मरेपर्यंत शेतकरी कामगार पक्ष सोडणार नाही, अशी शपथ घेणारे जगताप पराभवानंतर पुन्हा राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाले. नंतर विधानसभा निवडणुकीत आपला पराभव दिसू लागला, म्हणूनच ते भाजपमध्ये प्रवेश करून मोदी लाटेत निवडून आले. तेव्हा त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करून टीका करावी. ज्यांनी आजवर विधिमंडळात कधी तोंडही उघडले नाही, त्यांनी माझ्या तीन वर्षांच्या लोकसभेतील कामकाजाचा लेखाजोखा केंद्र सरकारच्या संकेत स्थळ उघडून पाहावा, असा खोचक सल्लाही बारणे यांनी जगतापांना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com