लग्नाच्या आमिषाने महिलेची 80 हजारांची फसवणूक

संदीप घिसे
बुधवार, 23 मे 2018

पिंपरी - भारत मेट्रोमनी या संकेतस्थळावर ओळख झालेल्या ठकाने महिलेस लग्नाच्या आमिषाने 80 हजारांचा गंडा घातला. या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपरी - भारत मेट्रोमनी या संकेतस्थळावर ओळख झालेल्या ठकाने महिलेस लग्नाच्या आमिषाने 80 हजारांचा गंडा घातला. या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रजेंद्र मेनॉर (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी तरुणाचे नाव आहे. याबाबत 37 वर्षीय महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रशांत महाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने भारत मेट्रोमनी या संकेतस्थवर विवाहाकरिता आपली नाव नोंदणी केली होती. तिथे तिची ओळख आरोपी राजेंद्र मेनॉर याच्याशी झाली. सोशल मिडियाच्या माध्यमातून ते ऐकमेकांच्या संपर्कात आले. आपण परदेशात डॉक्‍टर असल्याचे फिर्यादी महिलेला सागंत तिचा विश्‍वास संपादन केला. तसेच लवकरच भारतात येणार असून आपण प्रत्यक्ष भेटू आणि त्यानंतर लग्न करू, असे तिला सांगितले.

आपण 23 फेब्रुवारी रोजी भारतात येणार असल्याचे राजेंद्र मेनॉर याने सांगितले होते. आपण विमानतळावर आलो असून कस्टममधील साहित्य मिळविण्यासाठी आपल्याकडे भारतीय चलन नसल्याचे सांगत तू माझ्या खात्यात 30 हजार रुपये भर असे सांगत त्याने बॅंकेचा खाते क्रमांक दिला. त्यानंतर त्या खात्यात पैसे न आल्याने दुसऱ्या खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. यामुळे फिर्यादी तरुणीने राजेंद्र याच्या खात्यावर दोनवेळा एकूण 79 हजार 800 रुपये पाठविले. मात्र त्यानंतर राजेंद्र याने फोन बंद केला. अनेकदा प्रयत्न करूनही राजेंद्र याच्याशी संपर्क न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी महिलेच्या लक्षात आले. त्यानुसार तिने मंगळवारी (ता.22) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: Pimpri news marriage fraud crime