जोरदार पावसाने पिंपरी शहराला झोडपले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

पिंपरी - परतीचा पाऊस शहराची पाठ सोडायचे नाव घेताना दिसत नाही. मंगळवारी दुपारी जोरदार पावसाने शहराला झोडपून काढले. तासभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले. शहर परिसरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी, वाकड भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यातच पावसाची भर पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

पिंपरी - परतीचा पाऊस शहराची पाठ सोडायचे नाव घेताना दिसत नाही. मंगळवारी दुपारी जोरदार पावसाने शहराला झोडपून काढले. तासभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले. शहर परिसरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी, वाकड भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यातच पावसाची भर पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

Web Title: pimpri news rain