पिंपरीत स्वाइन फ्लूने तिघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

पिंपरी - शहरात दोन दिवसांत तीन जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. दिघी येथील एका चार वर्षीय चिमुकलीचा स्वाइन फ्लूने बुधवारी (ता. 13) बळी गेला. मंगळवारी (ता. 12) प्राधिकरण येथील 75 वर्षीय रुग्णाला स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करून कृत्रिम श्‍वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच जुन्नर येथील 55 वर्षीय रुग्णाला 18 ऑगस्ट रोजी स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 