वाहतूक पोलिसांना चकवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

पिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना नोटिसादेखील पाठवण्यात येतात. गेल्या एक जानेवारी ते २३ मेपर्यंतच्या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सीसीटीव्हीच्या आधारे पाठवण्यात आलेल्या नोटिसांपैकी ८८ टक्‍के वाहनचालकांनी दंडाची रक्‍कम न भरल्याचा अजब प्रकार समोर  आला आहे. यासंदर्भातील  अहवाल नुकताच ‘सकाळ’च्या हाती लागला. 

सिग्नल तोडणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, पांढऱ्या पट्ट्यावर वाहन थांबवणे, असे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांची नजर असते. नियम तोडणाऱ्या वाहनांचे क्रमांक सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेऊन त्यांना वाहतूक पोलिस दंड भरण्यासंदर्भात नोटीस पाठवत असतात. मात्र, वाहनचालकांकडून त्याकडे काणाडोळा करण्यात येत असल्याचे यामधून समोर आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण १,२५० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. 

नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी थेट कारवाई केली असली, तरी यामध्येदेखील २५ टक्‍के महाभागांनी ही रक्‍कम भरली नसल्याचे उघड झाले आहे. 

वाहतूक पोलिसांना दंडाची रक्‍कम वसूल करण्यासाठी मशिन देण्यात आल्या आहेत. या कालावधीत मशिनद्वारे नियम तोडणाऱ्या चार लाख ४० हजार ९६ जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्यापैकी तीन लाख ३१ हजार ३२२ जणांनी दंडाची रक्‍कम भरली, तर उर्वरित एक लाख आठ हजार ७७४ जणांनी तीन कोटी ५५ लाख १७ हजार २१८ रुपयांची रक्‍कम थकीत ठेवली आहे.

Web Title: pimpri news Traffic Police