महिला पोलिसाच्या मुलाच्या मारेकऱ्यांना अटक 

रविंद्र जगधने
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

पिंपरी - एका महिला कर्मचाऱ्याचा मुलगा आदित्य सुनीत जैंद (वय 21) याचा सोमवारी (ता. 11) प्रेमप्रकरणातून लाथाबुक्‍यांनी व कठीण वस्तूने मारहाण करून खून केला. याप्रकरणी दोघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. 

अक्षय अशोक मोरे (वय 24, रा. मोहननगर, पिंपरी) आणि नीलेश राजकुमार गायकवाड (वय 23, रा. गणराज माऊली, शाहूनगर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत, तर धीरज शिंदे हा संशयित फरार आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हा अक्षय याच्या मैत्रिणीबरोबर चिंचवड येथील तिच्या घरात बोलत होता. ते अक्षय याने पाहिले. त्यामुळे चिडलेल्या अक्षयने मैत्रिणीला बॅटने मारहाण करून जखमी केले. तसेच मित्रांना बोलावून घेऊन आदित्य याला मोटारीतून त्रिवेणीनगर येथील उद्यानात नेऊन लाथाबुक्‍क्‍यांनी व कठोर वस्तूने जबर मारहाण करून त्याचा खून केला. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त राम मांडूरके यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलिस निरिक्षक (गुन्हे) विनायक साळूंखे यांनी संशयित आरोपींना काही तासात जेरबंद केले.

टॅग्स