पिंपरी टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

पिंपरी - शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय आणि न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीची आवश्‍यकता असून, त्याची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवारी सांगितले. 

टपाल कार्यालय आणि पासपोर्ट कार्यालय यांच्यातर्फे पिंपरीमधील टपाल कार्यालयात नव्याने सुरू केलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी बारणे बोलत होते. आमदार गौतम चाबुकस्वार, महापौर नितीन काळजे, पासपोर्ट कार्यालयाचे विभागीय अधिकारी अतुल गोतसुर्वे, पोस्टमास्तर जनरल गणेश सावळेश्‍वर, डाक विभागाच्या संचालिका सुनीता अयोध्या, वरिष्ठ पोस्टमास्तर अभिजित बनसोडे उपस्थित होते.

बारणे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडप्रमाणेच पनवेलमध्येही पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव विदेश मंत्रालयाकडे दिला आहे. त्यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या २२ लाखांवर आहे. त्यामुळे 

शहरात सर्वच सरकारी कार्यालये आवश्‍यक आहेत. शहराला स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय मिळावे, अशी मागणी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्राच्या उपक्रमात पिंपरी-चिंचवडचा समावेश केला. यामुळे शहरातील नागरिकांना चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध झाली आहे.’’ 

गोतसुर्वे म्हणाले, ‘‘पासपोर्ट ही आजच्या घटकेला गरजेची वस्तू बनली आहे. आर्थिक सशक्‍तीकरणास त्याचा फायदा होत आहे. देशाची लोकसंख्या १२५ कोटींवर असून, सध्या परिस्थितीत फक्‍त सात कोटी लोकांकडेच पासपोर्ट आहे. देशात पासपोर्ट काढणाऱ्यांचे प्रमाण अवघे चार ते पाच टक्के आहे. त्यात वाढ होण्याची आवश्‍यकता आहे. केरळ, तमिळनाडू भागातील लोक नोकरी व्यवसायानिमित्त विदेशात जातात. अनिवासी भारतीयांनी ५०० कोटी डॉलर भारतात पाठवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया फारच सुलभ झाली आहे. पोलिस व्हेरिफिकेशनसाठी सुरू केलेल्या टॅब उपक्रमात राज्यात पुणे पहिल्या आणि देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.’’

पहिल्या दहा दिवसांच्या अपॉइंटमेंट फुल्ल 
पिंपरी टपाल कार्यालयात सुरू केलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रात पहिल्या दहा दिवसांच्या अपॉइंटमेंट फुल्ल झाल्या आहेत. प्रत्येक दिवशी इथे ५० जणांना अपॉइंटमेंट दिली जाणार आहे. सध्याचा ५० हा आकडा नजीकच्या काळात ३०० पर्यंत नेण्यात येणार आहे, असे गोतसुर्वे यांनी सांगितले.