सराईत गुंडाचा आकुर्डीत खून

सराईत गुंडाचा आकुर्डीत खून

रावण साम्राज्य, महाकाली व एस. के. ग्रुप (सोन्या काळभोर) या शहरातील टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून रावण साम्राज्य टोळीच्या म्होरक्‍याचा तलवार, कोयत्याने वार करून व दगडाने ठेचून खून करण्यात आला. आकुर्डी गावठाणातील पंचतारानगरमध्ये सोमवारी (ता. २०) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. 

अनिकेत राजू जाधव (वय २२, रा. जाधव वस्ती, रावेत) असे खून झालेल्याचे नाव आहे. सोन्या काळभोर, अक्षय काळभोर (दोघे रा. पंचतारानगर, आकुर्डी), दत्ता काळभोर (रा. समर्थनगरी, निगडी), हनुमंत ऊर्फ हनम्या शिंदे (रा. देहूरोड), जीवन सातपुते, बाबा उर्फ अमित फ्रान्सिस (रा. भोसरी) यांच्यासह इतर दोघांवर गुन्हा दाखल आहे. हनुमंत शिंदे हा महाकाली टोळीचा सदस्य असून त्याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. सूरज संतोष दास (वय १८, रा. महादू वाल्हेकर चाळ, वाल्हेकरवाडी) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेतने गेल्या महिन्यात देहूरोड परिसरात पूर्ववैमनस्यातून हनुमंतवर गोळीबार केला होता. त्यामुळे अनिकेतला संपवायचा कट एसके ग्रुप व महाकाली टोळीने रचला. अनिकेत व त्याचा मित्र सूरज दास सोमवारी रात्री पंचतारानगरमधून दुचाकीने जात असताना त्याला अरुंद रस्त्यात गाठून तलवार, कोयत्याने वार केले व दगडाने ठेचून मारले. त्या वेळी दास पळून गेला. घटनेनंतर हल्लेखोरही पसार झाले होते. दरम्यान, अनिकेत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, दरोडा, गंभीर दुखापत आदी गुन्हे दाखल आहेत; तर सोन्या काळभोर याला पुणे व पिंपरी- चिंचवड शहरातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. त्याची मुदत २७ ऑगस्ट रोजी संपली होती.

शहरातील गुन्हेविषयक घटना
तोडफोड

घरकुलमध्ये टोळक्‍याकडून तोडफोड (७ ऑक्‍टोबर २०१७)
पिंपरीत १५ वाहनांची तोडफोड (१९ डिसेंबर २०१६)
थेरगावमध्ये २२ वाहनांची तोडफोड (१० जून २०१६)
चिंचवडगावात १७ वाहनांची तोडफोड (७ सप्टेंबर २०१७)
पिंपळे निलखमध्ये १३ वाहनांची तोडफोड (६ मे २०१७)

खून 
गुंड प्रकाश चव्हाण याचा खून (११ डिसेंबर २०१४)
नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा खून (३ सप्टेंबर २०१५)
गुंड गोट्या धावडे याचा खून (२९ नोव्हेंबर २०१२) 
सुहास हळदणकर या कार्यकर्त्याची हत्या (९ एप्रिल २०१७)
अजिंक्‍य जैद या पोलिसाच्या मुलाचा खून (११ सप्टेंबर २०१७)

गोळीबार
गुन्हेगार संतोष कुरवतवर गोळीबार (१५ सप्टेंबर २०१७)
गवळीमाथा येथे हॉटेल चालकावर गोळीबार (१६ सप्टेंबर २०१७)
बांधकाम व्यावसायिकांवर पिंपरी गुरवमध्ये गोळीबार (२४ जून २०१७)

इतर
गर्भपातास नकार देणाऱ्या डॉक्‍टरवर हल्ला (१० सप्टेंबर २०१७)
भाजप आमदाराच्या मुलीवर वाकडमध्ये हल्ला (३ एप्रिल २०१७)
कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी नगरसेविकेच्या पतीला अटक (१५ सप्टेंबर २०१७)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com