दस्तनोंदणीतून १२९ कोटी रुपये

दस्तनोंदणीतून १२९ कोटी रुपये

पिंपरी - हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्कमुळे निर्माण झालेली ओळख, विकासाचा वाढता वेग, जमिनीला आलेला सोन्याचा भाव आणि लोकसंख्येबरोबरच वाढलेले नागरीकरण यामुळे हिंजवडीलगतच्या मुळशी तालुक्‍यात मालमत्ता खरेदीचा व्यवसाय सध्या विशेष तेजीत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबरअखेर मुळशी दुय्यम निबंधक कार्यालयात जवळपास ११ हजार दस्तनोंदणी झाली असून, त्यातून सरकारच्या तिजोरीत तब्बल १२९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. सरकारने या वर्षासाठी देऊ केलेल्या १३५ कोटी रुपये उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकत मुळशी तालुक्‍याने येथील मालमत्ता खरेद-व्विक्रीचा वाढता ‘ट्रेंड’ अधोरेखित केला आहे. 

उद्दिष्टपूर्तीचा हा दर ९५ टक्के असून, महिन्याला त्यात सरासरी १२ ते १५ कोटी रुपये महसुलाची भर पडत आहे. हा आकडा विचारात घेता वर्षअखेरीपर्यंत तो दीडशे कोटींच्याही पुढे उड्डाण करेल, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 

सह दुय्यम निबंधक श्रेणी-१, मुळशी क्रमांक २ हिंजवडी कार्यालयाच्या अखत्यारीत १४९ गावांचा समावेश होतो. त्यामध्ये हिंजवडीसह आजूबाजूच्या माण, मारुंजी, जांबे, नेरे, कासारसाई या गावांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांत माण, मारुंजी आणि हिंजवडीचा आयटी हबभिमुख विकास झाला आहे. तर, जांबे, नेरे, कासारसाई या गावांची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवरच चांगल्या गुंतवणुकीची संधी म्हणून या गावांकडे पाहिले जात आहे. एकीकडे हिंजवडी, माण, मारुंजी परिसरात सदनिकांची जोरदारपणे खरेदी-विक्री होत आहे. तर, दुसरीकडे जांबे, नेरे, कासारसाईमध्ये मोकळ्या भूखंडांमध्ये पैसा गुंतविण्यावर भर दिला जात आहे.

व्यावसायिकांसह गुंतवणूकदार आणि आयटीयन्सकडून या परिसरातील मालमत्ता खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. शेती विकास झोनमध्ये मोडणाऱ्या या गावांमध्ये तुकडाबंदी कायदा लागू होत असल्याने बहुतांश विकसकांनी ‘प्लॉटिंग’च्या व्यवसायात उडी घेतली आहे. वाढत्या मागणीमुळे जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. त्यातून मुद्रांक शुल्कातही वाढ नोंदविली जात असून, सरकारला त्यातून मोठा महसूल प्राप्त होत आहे.

दस्तसंख्या १०,७३६
जमा नोंदणी शुल्क (रुपयांत) ११ ,७६,३८,२६६ 
मुद्रांक शुल्क ११७,४४,९,२९१
एकूण महसूल १२९,२०,४७,५५७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com