शास्तीकर रद्दसाठी सामाजिक संघटना, सर्व पक्षीयांचे धरणे आंदोलन 

शास्तीकर रद्दसाठी सामाजिक संघटना, सर्व पक्षीयांचे धरणे आंदोलन 

पिंपरी - अनधिकृत बांधकामे नियमित करावीत, संपूर्ण शास्तीकर रद्द करावा, कालबाह्य झालेला रिंगरोड रद्द करावा, शहरातील नागरिकांसाठी अंत्यविधीचा पूर्ण खर्च महापालिकेने करावा आणि बोपखेल व दापोडी रस्त्याचे काम ताबडतोब सुरू करावेत. आदी मागण्यांसाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी धरणे आंदोलन केले. 

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर व स्वराज अभियानचे मानव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या आंदोलनास खासदार श्रीरंग बारणे,  आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी भेट दिली. तर आंदोलनात महापालिका विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे,  शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक नाना काटे, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, गीता मंचरकर, आशा भालेकर, सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट,  दत्ता साने, अश्विनी चिंचवडे, भारिप बहुजन महासंघाचे देवेंद्र तायडे, अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्धीक शेख, घर बचाओ संघर्ष चळवळीचे धनाजी येळकर,  नागरि हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार,  एमआयएमचे धम्मराज साळवे, शेतकरी कामगार पक्षाचे हरिष मोरे,  समाजवादी पक्षाचे नरेंद्र पवार,  सुशीला पवार,  आनंदा कुदळे यांच्यासह विविध साामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. 

सत्तेत असलेले भाजप निवडणुकीच्या अगोदर नागरिकांच्या विटेलाही धक्का लागू देणार नाही.  असे म्हणत होते. मात्र, आता त्यांना त्याचा विसर पडला आहे. शास्तीकर वसूल करण्यासाठी मिळकत धारकांना नोटीस बजावून मालमत्ता जप्ती करण्याची धमकी देऊन पठाणी पद्धतीने शास्तीकर वसूल करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. कालबाह्य झालेला रिंगरोड केल्यामुळे अनेक नागरिक बेघर होणार आहेत. त्यामुळे रिंगरोड रद्द करावा. तसेच शहरातील सर्व धर्मीयांच्या अंत्यविधीसाठी महापालिकेने खर्च करण्याचा ठराव झाला असतानाही त्याची अंमलबजावणी झाली नाही. आदी मुद्यांवर विविध वक्‍त्यांनी मनोगत व्यक्त करून भाजप सरकारवर सडकून टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com