अकरा वर्षांच्या मुलावर दहावीतील विद्यार्थ्याचा लैंगिक अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पिंपरी - दापोडी येथील एका आश्रमात राहणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्याने आपल्यासोबत आश्रमातच राहणाऱ्या 11 वर्षांच्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

पिंपरी - दापोडी येथील एका आश्रमात राहणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्याने आपल्यासोबत आश्रमातच राहणाऱ्या 11 वर्षांच्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

याबाबत पीडित मुलाच्या आईने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आश्रम चालकावर गुन्हा दाखल झाला असून, अत्याचार करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आश्रम शाळेतीलच एका 11 वर्षांच्या विद्यार्थ्यावर वेळोवेळी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. याबाबत पीडित मुलाने आश्रम चालकाला सांगूनही आश्रम चालकाने कारवाई करण्यास टाळाटाळ केली. यासाठी पीडित मुलाच्या कुटुंबीयांना दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी 12 हजार रुपये दिल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.

Web Title: pimpri pune news crime