महाकाली टोळीतील सराईत गुन्हेगार हिंजवडीत जेरबंद 

रवींद्र जगधने
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

पिंपरी - कुख्यात महाकाली टोळीतील सराईत गुन्हेगाराला पाच पिस्टल व 15 काडतुसांसह हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई सोमवारी (ता. 20) दुपारी चारच्या सुमारास हिंजवडीतील आशीर्वाद हॉटेलसमोर करण्यात आली. 

सागर कुमार इंद्रा (वय 23, रा. थेरगाव) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकाली टोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर हा आशीर्वाद हॉटेलसमोर आल्याची माहिती खबऱ्यामार्फत सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धामणे यांना मिळाली. त्यानुसार परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील, वरिष्ठ निरीक्षक अरुण वायकर, निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली धामणे यांच्यासह विवेक गायकवाड, किरण लांडगे, आनंद खोमणे, संदीप होळकर, आशिष बोटके, अतिक शेख, ज्ञानेश्वर मुळे व अण्णा गायकवाड यांनी सापळा रचून आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडून पाच गावठी पिस्टल, 15 काडतुसे व मोटार जप्त करण्यात आली. त्याच्या नावावर फरासखाना, हिंजवडी, चिंचवड, देहूरोड, निगडी आदी पोलिस ठाण्यात खून, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोडा तयारी, चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: pimpri pune news criminal arrested