विद्यार्थ्यांची स्वतंत्र बॅच कशासाठी?

विद्यार्थ्यांची स्वतंत्र बॅच कशासाठी?

पिंपरी - आरटीईच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र बॅच तयार करणाऱ्या चिंचवड गावातील इंटरनॅशनल स्कूलविरोधात पालकांनी केलेल्या तक्रारीची दखल शिक्षण विभागाने घेतली आहे. कार्यवाहीचा अहवाल त्वरित कार्यालयास सादर करावा, अशी नोटीस शाळेला बजावली आहे.

आरटीई प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे सरकारकडून शुल्क मिळत नसल्याने शाळा प्रशासन पालकांची अडवणूक करत आहे. आता स्वतंत्र बॅच करण्याचा घाट घातल्यामुळे आरटीईचे प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२च्या पोटकलम (१)च्या खंड (ग) अनुसार प्रवेश दिलेल्या बालकांना सापत्न भावाची वागणूक दिली जाणार नाही. त्या वर्गामध्ये इतर बालकांपासून वेगळे ठेवले जाणार नाही. अथवा त्यांचे वर्ग इतर बालाकांसाठी भरविण्यात येणाऱ्या वर्गाच्या ठिकाणापेक्षा व वेळेपेक्षा वेगळे भरविण्यात येणार नाहीत. त्याकरिता व इतर बालकांकरिता जादा वर्गाव्यतिरिक्‍त कोणतेही कार्यक्रम स्वतंत्रपणे राबविण्यात येणार नाहीत, अशी तरतूद आहे.

परंतु काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा अशी छुप्या पद्धतीने कार्यवाही करत आहेत. शाळेने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्वरित या कार्यालयास सादर करण्याचे आदेश प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांनी दिले आहेत. 
आरटीई पालक संघाचे अध्यक्ष हेमंत मोरे म्हणाले, ‘वेगळी बॅच करून अशाप्रकारे शाळांना आरटीईच्या विद्यार्थ्याबाबत दुजाभाव करण्याचा कोणताही अधिकार नाही. या विरोधात १६ पालकांनी शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार केलेली आहे.’’

पालकांच्या मते,
सुरवातीला शाळा व्यवस्थापनाने पहिलीचे प्रवेश वेगळ्या बॅचमध्ये भरणार असे सांगितले. पहिल्यांदा ‘बॅच प्रेफरन्स’ सगळ्यांसाठी सारखाच दिला होता. यानंतर अचानक मेसेज आला की आरटीईसाठी दुपारची बॅच आहे. त्यातच प्रवेश घ्यावा लागेल. आरटीईचे जेवढे पालक होते, त्यांना एकच बॅच दिली. आणि आता आरटीईची वेगळी बॅच करणार म्हणून शाळेने आरटीईच्या पालकांना निरोप दिला.

‘त्या’ इंटरनॅशनल शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सकाळची बॅच देत नसल्याची तक्रार १६ पालकांची केली होती. त्यावरून शिक्षण विभागाने अहवाल मागितला आहे. 
 - बजरंग आवारी, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com