स्पायसर विद्यापिठातील फसवणूकीबाबत कारवाई व्हावी 

please take Action about fraud in the Spaisar University
please take Action about fraud in the Spaisar University

पुणे (औंध) - औंध परिसरातील स्पायसर अॅडव्हेंटीस्ट विद्यापीठाचे कुलगुरु नोबल प्रसाद पिल्ले यांनी बनावट पी.एच.डी. पदवीद्वारे पदोन्नती आणि आर्थिक फायदे घेवून फसवणूक केल्याचे प्रकरण काही दिवसांपुर्वीच उघड झाले आहे. या प्रकरणी कुलगुरुंसह यात सहभागी असलेल्या इतरांवर कडक कारवाई करुन विद्यापीठावर प्रशासकाची नेमणूक करावी अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या डॉ.निलम गो-हे यांनी राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव यांच्याकडे मेलद्वारे केली आहे. 

बनावट पदवीच्या आधारे कुलगुरूंनी सन २०१० ते २०१३ या कालावधीत स्पायसर अॅडव्हेंटीस्ट विद्यापठात पदोन्नती आणि आर्थिक फायदे घेऊन फसवणूक केली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनीही याप्रकाराबाबत मला पत्र देवून लक्ष वेधले होते याची माहितीही यावेळी डॉ.गो-हे यांनी दिली. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अॅलन अलमेडिया यांनी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात १६ मे २०१८ रोजी कुलगुरूसह इतर पाच जणांविरुद्ध तक्रार केली होती. यावरुन, कुलगुरुंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कुलगुरू नोबल प्रसाद पिल्ले, मुख्य वित्तीय अधिकारी रत्नास्वामी जयेम, कला शाखेचे प्रमुख चाको पॉल, क्रिएटीव्ह एज्युकेशनल फाऊंडेशनचे संचालक गोपाल भिकाजी खंदारे आणि या बनावट पदव्या मिळवून देणारा अशा पाच जणांवर स्पायसर विद्यपीठाची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी याप्रकरणी विद्यापीठावर तात्काळ प्रशासकाची नेमणूक करुन आरोपींवर कडक कारवाई करावी आणि विद्यापिठाचे जे आर्थिक नुकसान झाले आहे त्याचीही भरपाई करून घेण्यात यावी अशी मागणी डॉ.गो-हे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com