पारंपरिकसोबत "हायटेक' प्रचारही 

rpi
rpi

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष-रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) युतीमधील महत्त्वाचा पक्ष असलेल्या रिपाइंने पदयात्रा, कोपरासभा, गाठीभेटी घेऊन मतदारांशी अधिकाधिक संवाद वाढविण्यावर भर देण्याचे निश्‍चित केले आहे. यासोबतच फेसबुक, ट्‌विटर, व्हॉट्‌सऍप, व्हिडिओसारख्या "हायटेक' प्रचाराचीही तयारी केली आहे. रिपाइंच्या उमेदवारांसह भाजपचे उमेदवारही कसे निवडून येतील, या दृष्टीने व्यूहरचना आखली आहे. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महापालिकेतील गेल्या पंधरा वर्षांतील बेजबाबदार कारभाराचा पुणेकरांसमोर लेखाजोखा मांडणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासाचे गणितही पक्ष मतदारांसमोर मांडणार आहे. या विषयी पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे म्हणाले, ""शहराचा विकास आणि पुणेकरांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठीच रिपाइंने महापालिका निवडणुकीत भाजपबरोबरची युती कायम ठेवली. शहरातील साडेपाचशे झोपडपट्ट्यांत पक्षाला मानणारा मतदार आहे. रिपाइंच्या दहा जागा जिंकण्याबरोबरच भाजपलाही आमच्या मतदारांचा व्हावा यासाठी पूर्ण ताकदीनिशी लक्ष घालणार आहोत. पदयात्रा, मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, ठिकठिकाणी कोपरा सभांद्वारे पक्षाची भूमिका मतदारांसमोर मांडण्यासोबतच त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत.'' 

उच्चशिक्षितांपर्यंत पोचण्यासाठी "आयटी विंग' कार्यरत राहील. प्रचार यंत्रणाही सक्षम केली जाईल. पक्षाच्या सर्व आघाड्याही प्रचारात उतरतील. झोपडपट्टी 
पुनर्वसन प्रकल्प (एसआरए), युवकांसाठी योजना, कौशल्याधारित प्रशिक्षण, बेरोजगारांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थ्यांसह तरुणांना पोलिस आणि लष्कर भरतीचे प्रशिक्षण, मोफत वाहनतळास चालना, दुर्बल घटकांसाठी त्यांच्या जागांवरच घरे बांधणे, नदी प्रदूषण थांबविणे आणि वाहतुकीची समस्या दूर करणे या मुद्‌द्‌यांना प्राधान्य देणार असल्याचेही कांबळे यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com