"पीएमपी' डेपोसाठी रेल्वेची जागा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

पुणे - हडपसर येथील रेल्वेच्या ताब्यातील जमीन पुणे परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल), तर पीएमपीएमएलची जागा रेल्वे प्रशासनाला देण्यात येणार आहे. या दोन्ही जागांचे हस्तांतर लवकरच होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. एस. चोक्कलिंगम यांनी दिली. 

प्रवाशांच्या दृष्टीने हडपसर येथील रेल्वेच्या ताब्यातील जागा "पीएमपी'साठी, तर पीएमपीसाठीची आरक्षित जागा प्रस्तावित जंक्‍शनसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही जमिनींचे हस्तांतर गरजेचे आहे. या प्रक्रियेनंतर हडपसरला दुसरे "रेल्वे जंक्‍शन' उभारण्याच्या कामाला गती मिळणार आहे. 

या संदर्भात विभागीय आयुक्तांनी कौन्सिल हॉल येथे रेल्वे, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात दोन्ही जागांच्या हस्तांतरास हिरवा कंदील दाखविला. 

हडपसरला नवे जंक्‍शन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, रेल्वे स्थानकाचा विस्तार आणि विकास केला जाणार आहे. स्थानकालगतची अंदाजे 1.2 हेक्‍टर (4 ते 5 एकर) जमीन पीएमपी डेपोसाठी प्रस्तावित आहे. ही जागा खासगी मालकीची असल्याने भूसंपादनास वेळ लागत आहे. महापालिकेने या जागेच्या बदल्यात संबंधित व्यक्तीला हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) किंवा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देऊन ही जमीन ताब्यात घ्यावी, आणि रेल्वेला हस्तांतरीत करावी, असे सुचविले आहे. 
- डॉ. एस. चोक्कलिंगम, विभागीय आयुक्त 

Web Title: PMP Depot train station land