पीएमपीच्या निधीसाठी ‘स्थायी’चा हिरवा कंदील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

पुणे - दैनंदिन संचालनातील तुटीचे १०८ कोटी, विविध प्रकारच्या पासपोटीचे १२ कोटी आणि अन्य निधी असे सुमारे १६० कोटी रुपये पीएमपीलादेण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी दिली. तर, मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांनी वाढ करण्याच्या प्रशासनाच्या ठरावावर विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. 

दैनंदिन संचालनातील तूट भरून काढण्यासाठी महापालिकेकडून पीएमपीला दरमहा सुमारे ९ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, पासपोटीचे ३२ कोटी द्यायचे होते. त्यातील २० कोटी रुपये महापालिकेने यापूर्वीच उचलस्वरूपात पीएमपीला दिले होते. त्यामुळे ती रक्कम वगळता उर्वरित १२ कोटी रुपये पीएमपीला देण्याचा ठराव स्थायी समितीने मंजूर केला. महापालिकेच्या दैनंदिन कामकाजातील सर्व प्रकारच्या नोंदी, इतिवृत्त, धोरणात्मक निर्णय, पन्नास लाख रुपयांवरील निविदा, स्थायी समितीमधील ठराव, आयुक्तांची परिपत्रके, शासकीय अध्यादेश आदी शहरातील नागरिकांना पाहण्यासाठी महापालिकेच्या प्रकाश कर्दळे ग्रंथालयात उपलब्ध करून देण्याचा ठरावही स्थायी समितीने मंजूर केला. खासगी जुन्या गृहरचना संस्थांमध्ये महापालिकेच्या निधीतून मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, असा अविनाश बागवे आणि अरविंद शिंदे यांनी दिलेला ठराव अभिप्रायासाठी प्रशासनाकडे पाठविण्यात आला. 

Web Title: PMP's funding issue slove