पोलिस आयुक्‍त रश्मी शुक्ला यांचे पती उदय शुक्ला यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

उदय शुक्ला हे मुंबईत पश्‍चिम रेल्वेमध्ये आय जी तथा मुख्य सुरक्षा आयुक्‍त म्हणून कार्यरत होते. गेल्या काही महिन्यांपुर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार चालु होते.

पुण्याच्या पोलिस आयुक्‍त रश्मी शुक्ला यांचे पती वरिष्ठ आयपीएस अधिकारी उदय शुक्ला यांचे आज (ता. 27 रविवारी) निधन झाले. गेल्या काही महिन्यांपुर्वी त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली.

उदय शुक्ला हे मुंबईत पश्‍चिम रेल्वेत आय जी तथा मुख्य सुरक्षा आयुक्‍त म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासुन त्यांची प्रकृती चिंताजनक आणि गंभीर होती. उदय शुक्ला यांच्या निधनामुळे संपुर्ण शुक्ला कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे. शुक्ला यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

उद्य शुक्ला यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता. त्यांचे निधन झाल्याचे समजताच अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी खाजगी रुग्णालयाकडे धाव घेतली.

Web Title: Police Commissioner Rashmi Shuklas husband Uday Shukla passes away