पोलीस निरिक्षकांच्या बदल्या 

जनार्दन दांडगे
शनिवार, 9 जून 2018

लोणी काळभोर - लोणी काळभोर (ता. हवेली) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोंडूभैरी यांची सातारा येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी सासवड (ता. पुरंदर) येथील पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांची रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या जागी यवत (ता. हवेली) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे (कंसात सध्याची नेमणूक ते बदलीचे ठिकाण) - 
मनोजकुमार यादव (चाकण पोलीस ठाणे ते रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे), धन्यकुमार चांगदेव गोडसे (यवत पोलीस ठाणे ते चाकण पोलीस ठाणे), राजेंद्र पांडुरंग कुंटे (शिरूर पोलीस ठाणे ते तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे), मुगुटलाल भान्नुदास पाटील (तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे ते सासवड पोलीस ठाणे), दगडू सायप्पा हाके (जेजुरी पोलीस ठाणे ते वडगाव मावळ पोलीस ठाणे), क्रांतीकुमार तानाजी पाटील (सासवड पोलीस ठाणे ते लोणी काळभोर पोलीस ठाणे), बाळासाहेब अण्णा कोंडूभैरी (लोणी काळभोर पोलीस ठाणे ते सातारा),प्रदीप शिवाजी काळे (वडगाव मावळ पोलीस ठाणे ते कोल्हापूर).

Web Title: Police Inspectors Transfers