पोलिस अधिकाऱ्याने जपली सामाजिक जाणिव; मुकबधिर विद्यार्थांसोबत वाढदिवस

Police officer celebrated his anniversary with the special students
Police officer celebrated his anniversary with the special students

चिमूर तालुका - पोलिस अधिकाऱ्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात भीतीयुक्त आदर असतो. तसेच त्यांच्या कर्तव्य कठोर पोलिसी खाक्याला सर्वच टरकुन असतात. मात्र चिमूर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत उप पोलिस निरीक्षक गणेश इंगोले यांनी त्यांचा वाढ दिवस मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरा करून सामाजिक जाणिवेचा परीचय करून दिला. त्यांच्या या सामाजिक जाणिवेची सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कर्ज काढून उत्सव, सण साजरे करण्याची आपली पद्धती आहे. तसेच धन धांडगे आपल्या लग्ण उत्सवातून अथवा वाढदिवसाच्या निमित्याने वारेमाप पैशाची उधडण करून श्रीमंतीचा टेंभा मिरवत असतात. मात्र अनेक सुहृदयी व्यक्ती अशा अनावश्यक खर्चाला फाटा देऊन गरजवंतांना, दुःखीतांना मदत करून किंवा त्यांना आपल्या आनंदात सहभागी करून वाढदिवस अथवा इतर दिवस साजरे करतात. चिमूर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले उप पोलिस निरीक्षक गणेश इंगोले यांनी चिमूर येथील मुकबधिर विद्यालयामध्ये वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला व कुटूंब, मित्र मंडळी यांना सुद्धा याप्रसंगी सहभागी करून घेतले.

मुक बधीर विद्यालय पुढील प्रांगणात टेबल खुर्च्या आणि मोठे लाईट लावण्यात आल्याने तसेच विद्यार्थ्यांना पोलिस अधिकाऱ्यांचे वाढदिवस असल्याचे माहित झाल्याने त्यांना मोठा आनंद झाला. मोठया आतुरतेने त्या क्षणाची वाट पाहत होते. इंगोले यांचे सोबत आपल्या हातवाऱ्यानी हितगूज करण्याचा प्रयत्न करीत हात उंचावुन आनंद व्यक्त करीत होते. जणु काही त्यांच्या करीता दिवाळी उत्सवच होता. या मुलांना सोबत घेऊनच कुंटूबा सह इंगोलेंनी केक कापला आणी त्यांना केक भरवला. मुक बधीर विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन उपयोगाकरीता टॉवेल देण्यात येऊन आमंत्रिता पुर्वी भोजन देण्यात आले. याप्रसंगी या मुकबधिर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंळत होते. या अनोख्या वाढदिवसाचे साक्षी पोलिस निरीक्षक प्रमोद मडामे, नगर परीषद उपाध्यक्ष तुषार शिंदे, नगरसेविका कंचर्लावार, नव स्वप्न ग्रृपचे पदाधिकारी, पत्रकार, मुख्याध्यापक कामडी व त्यांचे सहकारी कर्मचारी वृंद आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

मौज मजा करून वाढदिवसाच्या नावाने पैशाची उधळण करण्या पेक्षा अशा समाजातील दिव्यांगा सोबत वाढदिवस साजरा करण्याची माजी मनिषा होती. माझ्या वाढदिवसाच्या निमित्त्याने झालेल्या कार्यक्रमात मुकबधिर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद माझ्याकरीता सगळ्यात मोठी भेट ठरली. - गणेश इंगोले, उप - पोलिस निरीक्षक, चिमूर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com