पोलिस आयुक्‍तालयाच्या सुविधा केंद्रात इच्छुकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (पोलिस व्हेरिफिकेशन) घेण्यासाठी पोलिस आयुक्‍तालयातील नागरिक सुविधा केंद्रात इच्छुकांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्यासाठी नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे ही सुविधा प्रत्येक पोलिस ठाण्यात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक 21 फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यासाठी 27 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. अर्जासोबत इच्छुकांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यासाठी पोलिस आयुक्‍तालयातील नागरिक सुविधा केंद्रात इच्छुक आणि त्यांच्या प्रतिनिधींची गर्दी वाढली आहे. तसेच, नागरिक सुविधा केंद्रात पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळे त्यांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. नागरिक सुविधा केंद्रातही उभे राहण्यास पुरेशी जागा नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. दरम्यान, नागरिकांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध होण्यासाठी ही सुविधा संबंधित पोलिस ठाण्यात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सुधीर काळे, मंदार बलकवडे यांच्यासह काही इच्छुकांनी "सकाळ'शी बोलताना केली.

पुणे

तुम्ही शाळा, कॉलेजमध्ये असताना गंमत म्हणून वहीच्या कव्हरवरील अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर दाढी-मिशा काढल्या असतील! पण अशाच प्रकारचे...

04.48 AM

पुणे - ‘‘आजही मुलगी जन्मली, की महिलेलाच दोषी धरले जाते. स्त्री- पुरुष समानतेच्या बाता मारणारे लोकदेखील स्त्रियांना दुय्यम स्थान...

03.48 AM

पुणे - राज्यात येत्या शनिवारी आणि रविवारी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शनिवारी विदर्भ, मराठवाड्यात...

03.24 AM