बालेकिल्ला राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान

उमेश शेळके
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

पुणे - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि मनसे हे पाचही पक्ष लोहियानगर- कासेवाडी (प्रभाग १९) मध्ये रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे बाद झालेले अर्ज, दोन्ही काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत, ऐनवेळी पक्षात येऊन उमेदवारी घेतलेले उमेदवार आदींमुळे या प्रभागातील लढत चुरशीची झाली आहे.

पुणे - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि मनसे हे पाचही पक्ष लोहियानगर- कासेवाडी (प्रभाग १९) मध्ये रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे बाद झालेले अर्ज, दोन्ही काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत, ऐनवेळी पक्षात येऊन उमेदवारी घेतलेले उमेदवार आदींमुळे या प्रभागातील लढत चुरशीची झाली आहे.

काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा प्रभाग. जीलेहुमा खान, सुधीर जानजोत, अविनाश बागवे, हीना मोमीन, कमल व्यवहारे या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक यांचा, तर भाजपचे नगरसेवक बापू कांबळे यांच्या पूर्वीच्या प्रभागाचा काही भाग मिळून हा प्रभाग तयार झाला आहे. साठ हजार लोकसंख्येच्या या प्रभागात बहुभाषिक आणि बहुजन समाज मोठ्या प्रमाणावर आहे. याच प्रभागातून काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे यांच्यासह जीलेहुमा खान आणि हीना मोमीन या दोन्ही विद्यमान नगरसेविका आपले नशीब अजमावत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक संदीप लडकत यांची पत्नी मनीषा लडकत भाजपकडून रिंगणात उतरल्या आहेत. त्याच

गटात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे ऐनवेळी काँग्रेसला विद्यमान नगरसेविका जीलेहुमा खान यांना पुरस्कृत करण्याची वेळ आली. 

भाजपचे नगरसेवक बापू कांबळे यांनी त्यांच्याऐवजी चिरंजीव शंतनू कांबळे यांना रिंगणात उतरवले आहे. कांबळे यांच्यासह अर्चना पाटील आणि रफीक शेख यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत कांबळे आणि संदीप नवघणे, काँग्रेसकडून नूरजहाँ शेख आणि रफिक अब्दुल शेख मैदानात उतरले आहेत. शिवसेनेकडून जावेद खान, ज्योती कदम, भारती दामजी आणि अमित जगताप, तर मनसेकडून भूपेंद्र शेडगे, लक्ष्मी कांबळे आणि अतुल जाधव हे रिंगणात आहेत.

दोन्ही काँग्रेसच्या मतविभागणीचा फायदा अन्य कोणत्या पक्षाला होणार की काँग्रेस आपला बालेकिल्ला राखणार, हा या प्रभागातील औत्सुक्‍याचा विषय आहे. ऐनवेळी पक्ष बदलून रिंगणात आलेल्या उमेदवारांमुळे लढतीत रंग भरला आहे.

पुणे

खडकवासला : धरण क्षेत्रात रविवारी सकाळी विक्रमी पाऊस पडला असून, 24 तासात 60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पानशेत धरण 100 टक्के...

10.48 AM

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत दरवर्षी प्रमाणे पालिका प्रशासनाकडुन गणपती उत्सवासाठी चोख...

10.03 AM

बारामती : 'राज्यात पाऊस होण्यासंबंधीचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरल्यास तोंडात...

09.45 AM