प्रभागातील रखडलेली कामे त्वरित मंजूर करणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

हडपसर - प्रभाग क्र. २३ मधील ससाणे रेल्वे क्रॉसिंग येथील रखडलेल्या भुयारी मार्गाचे काम तातडीने मंजूर करून घेऊ आणि ते सुरू करू. विकास आराखड्यातील मंजूर मंत्री मार्केट ते काळेबोराटेनगर रस्त्याचे काम त्वरित सुरू करणार, ससाणेनगर-काळेबोराटेनगर परिसराची वाहतूक समस्या सोडविणार, असे आश्‍वासन या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पदयात्रेदरम्यान दिले. 

हडपसर - प्रभाग क्र. २३ मधील ससाणे रेल्वे क्रॉसिंग येथील रखडलेल्या भुयारी मार्गाचे काम तातडीने मंजूर करून घेऊ आणि ते सुरू करू. विकास आराखड्यातील मंजूर मंत्री मार्केट ते काळेबोराटेनगर रस्त्याचे काम त्वरित सुरू करणार, ससाणेनगर-काळेबोराटेनगर परिसराची वाहतूक समस्या सोडविणार, असे आश्‍वासन या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पदयात्रेदरम्यान दिले. 

प्रभाग २३ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सावली फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक योगेश ससाणे, शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय मोरे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले आणि नगरसेवक व माजी महापौर वैशाली बनकर हे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी पदयात्रा काढून नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. ससाणेनगर येथे महापालिकेच्या आरक्षित जागेवर इंग्रजी माध्यमाची अत्याधुनिक शाळा सुरू करणार, नाला गार्डन उभारणार, महिलांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृह बांधणार, पथारीवाल्याचे पुनर्वसन करणार, हडपसर वेशीचे सुशोभीकरण करून त्यावर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार, डांगमाळी मळा येथील वलय सोसायटीकडे जाणारा रस्ता पालिकेच्या ताब्यात घेऊन तो सिमेंट काँक्रीटचा करणार, तेथील दुरवस्था झालेली जिम व जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करणार, असे आश्‍वासन उमेदवारांनी दिले. 

नागरिक संतोष भाईक म्हणाले, आमच्या प्रभागात गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाने विविध विकासकामे केली आहेत. नगरसेवकांचा प्रत्येक मतदाराशी चांगला संपर्क आहे. तळागाळातील व्यक्तीला केंद्रबिंदू मानून व जनतेच्या गरजा लक्षात घेऊन या भागात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कामे केली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना या भागातील नागरिक पुन्हा संधी देतील, यात कोणतीही शंका नाही.

पुणे

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात श्रावणी बैलपोळ्यानिमित्त ठिकठिकाणी बैलांना सजवून त्यांची वाजत...

08.09 PM

तळेगाव दिघे (जि. नगर) संगमनेर येथील गीता परिवार संचालित संस्कार बालभवनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'मातीतून घडवू गणेश’...

04.00 PM

खडकवासला : धरण क्षेत्रात रविवारी सकाळी विक्रमी पाऊस पडला असून, 24 तासात 60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पानशेत धरण 100 टक्के...

10.48 AM