सब ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात प्रदीप मोरेचा विजय

Pradeep More victory in the inaugural match of the Junior Boxing Championship
Pradeep More victory in the inaugural match of the Junior Boxing Championship

लोणी काळभोर (ता. हवेली) - येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथे आयोजित राज्यस्तरीय पाचव्या सब ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात औरंगाबाद येथील प्रदीप मोरे याने उत्कृष्ट खेळ करत पिंपरी चिंचवडच्या अनिस पालचा 10-9 असा पराभव केला. तसेच दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यांत यशराज कुलकर्णी, निरंजन माने, भागवादीन वर्मा, शुभम कारले, रिध्वीक परब, कुणाल माने, असिफ खान, मनिष जाट आणि अमन दुलगज यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना व एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 14 ते 17 जून दरम्यान, राज्यस्तरीय पाचव्या सब ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी 26 जिल्ह्यातील सुमारे दोनशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एकूण 26 बाऊट झाले. यावेळी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव भारतकुमार वाव्हळ, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. मंगेश कराड, कदम वाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष बी. जी. अगवाने, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव, स्पर्धेचे व्यवस्थापक अभिमान सुर्यवंशी, संपत साळुंखे उपस्थित होते. 

दरम्यान, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यांचे वजनी गट व पुढच्या फेरीसाठी निवड झालेले खेळाडू कंसामध्ये मुष्टीयुद्ध संघटनेचे नाव - 
वजनी गट - ४४ किलो - यशराज कुलकर्णी (नागपूर शहर), निरंजन माने (सातारा जिल्हा), भागवादीन वर्मा (जळगाव जिल्हा ), शुभम कारले (नगर), रिध्वीक परब (मुंबई)
वजनी गट - ४६ किलो - कुणाल माने (सातारा जिल्हा), असिफ खान (मुंबई क्रीडा प्रबोधिनी)
वजनी गट - ४८ किलो - मनीष जाट (धुळे), अमन दुलगज (मुंबई)
वजनी गट - ५२ किलो - देवशिश चांगरे (जळगाव शहर), दिपक वाघ (पुणे जिल्हा).
वजनी गट - ५४ किलो - आरमान शुक्ला (नागपूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com