शहरात चार ठिकाणी प्री-पेड रिक्षा स्टॅंड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

पुणे - शहरात स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानक, पुणे स्टेशन आणि संगमवाडीतील खासगी बस स्टॅंडजवळ प्री-पेड रिक्षा स्टॅंड उभारण्याचे निश्‍चित झाले आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या बाबतच्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीए) बैठकीत मंजुरी दिली जाईल. 

शहरात यापूर्वी प्री-पेड रिक्षा स्टॅंड सुरू होते. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला होता. परंतु, त्यात सातत्य नसल्यामुळे हे स्टॅंड बंद पडले होते. परंतु, कॅब कंपन्यांची स्पर्धा निर्माण झाल्यामुळे रिक्षा संघटनांनीच याबाबत पुढाकार घेतला आहे. प्री-पेड रिक्षा स्टॅंड सुरू करण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्यातील एक स्टॅंड चालविण्याची तयारी आम आदमी पार्टीने दर्शविली आहे. काही संघटनांनीही या उपक्रमात सहभाग घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्याबाबतही विचार करण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली. दरम्यान, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी एक मेपर्यंत रजेवर आहेत. ते परतल्यावर लगेचच प्रादेशिक परिवहनाची बैठक होऊन या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार आहे.

Web Title: pre-paid rickshaw stand