गर्भवतींसाठी ‘ती’ ॲम्ब्युलन्स!

Women-issue
Women-issue

प्रसूतीच्या वेदना सहन करणाऱ्या गर्भवतींना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मिळणे, हेच बहुतांश प्रकरणांमध्ये खडतर आव्हान असते. अशा घटना घडू नयेत यासाठी ‘सकाळ’मधील ‘ती’च्या कळा या वृत्तमालिकेची दखल घेत खास गर्भवतींसाठी शहरात रुग्णवाहिका सुरू केली जाणार आहे. अशा प्रकारचा हा शहरातील पहिलाच उपक्रम असेल.

पुणे - शहरात महापालिका, खासगी आणि रुग्णालयांच्या मालकीच्या अंदाजे १,२६३ रुग्णवाहिका असल्याची नोंद आहे. मात्र अनेकदा धावाधाव करूनही वेळेत रुग्णवाहिका मिळत नाही, असा गरीब रुग्णांचा अनुभव आहे. शुभांगी जानकर या तरुण महिलेचा अशाच कारणामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्याची दखल घेत नगरसेविका रेखा चंद्रकांत टिंगरे यांनी ‘ती’ या विशेष 
रुग्णवाहिकेची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयातील प्रसूतिगृहासारखीच ही रुग्णवाहिका सुसज्ज असेल. ‘सध्या महापालिकेकडे महिलांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका नाही. अशी रुग्णवाहिका असावी, असे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात आले आहे. अशी सुविधा कुणी पुरवत असेल, तर त्यास सहकार्य केले जाईल’, असे महापालिकेच्या प्रशासनाने ‘सकाळ’ला सांगितले.

शहरातील महिलांच्या आरोग्याला प्राधान्य आहे. गर्भवतींना तत्पर सेवा पुरविण्यासाठी ‘ती’ रुग्णवाहिका उपयुक्त ठरेल. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य असेल. शिवाय, अशा रुग्णवाहिका सुरू करण्याबाबत खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनाला आवाहन केले जाईल.
- सौरभ राव, महापालिका आयुक्त

शुभांगी जानकरच्या मृत्यूला आरोग्य खाते जबाबदार आहे. महिलांच्या नेमक्‍या गरजा ओळखून सुविधा देण्याची गरज आहे. समाजातील गरजू आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी मोफत चार रुग्णवाहिका पुरविण्यात येतील. त्याचा खर्च माझ्या मानधनातून करणार आहे.
- रेखा चंद्रकांत टिंगरे, नगरसेविका

...अशी असेल ‘ती’ रुग्णवाहिका !
 प्रसूतितज्ज्ञ
 महिला वाहक, महिला अटेंडन्ट
 प्राथमिक उपचाराची सुविधा
 प्रसूतीआधीची आवश्‍यक उपचार यंत्रणा
 झोपडपट्ट्यांच्या परिसरात रुग्णवाहिकांसाठी केंद्र
 महापालिका व खासगी संस्थांच्या माध्यमातून नोंदणी करण्याची सुविधा

महापालिका रुग्णालयांचा असा अनुभव तुम्हाला आला आहे का? त्यावर 
प्रॅक्‍टिकल उपाय काय करता येतील, हे तुम्हाला सुचत आहे? 

आपल्या सूचना फेसबुक आणि ट्विटरवर मांडा #pmchealth हॅशटॅगवर
ई- मेल करा webeditor@esakal.com वर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com