आकाशकंदील स्वत: करा तयार

Lantern
Lantern

पुणे - स्वत:च्या हाताने एखादी वस्तू तयार करण्याची मज्जा काही औरच असते. यंदाच्या दिवाळीत स्वत:च्या हाताने तयार केलेले आकाशकंदील लावण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. ‘सकाळ’तर्फे आकाशकंदील बनविणे कार्यशाळा घेण्यात येणार असून, ती विविध ठिकाणी २८ ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. 

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत दिवाळीत लागणाऱ्या आकाशकंदीलांचे आकर्षण असते. ते स्वत: कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही कार्यशाळा सर्व वयोगटांसाठी असून, कंदील बनविण्याचे सर्व साहित्य दिले जाणार आहे. पुणे व पिंपरी परिसरातील निवडक शाळा व मॉल्समध्ये ही कार्यशाळा होणार आहे. यात सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 

अधिक माहिती
 कधी : २८ ऑक्‍टोबर रोजी
 केव्हा : - शाळांमध्ये : सकाळी ९ ते १०.३०, मॉल्समध्ये : सायं ५ ते ६.३० 
 प्रवेश शुल्क : रु.५० प्रत्येकी 
 संपर्क : ८८०५००९३९५ किंवा ९५५२५३३७१३.

कार्यशाळेची ठिकाणे 
 नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड 
 फिनिक्‍स मार्केटसिटी, विमाननगर
 पुणे सेंट्रल मॉल, कर्वे रस्ता 
 पुणे सेंट्रल मॉल, विद्यापीठ रस्ता
 पुणे सेंट्रल मॉल, अमानोरा टाऊन सेंटर, मगरपट्टा 
 सीएम इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी
 पाठशाळा प्री-स्कूल, बाणेर
 पाठशाळा प्री-स्कूल, रहाटणी
 सनशाईन प्री प्रायमरी स्कूल, आंबेगाव बुद्रुक
 अभिषेक इंटरनॅशनल स्कूल, मोशी
(आपल्या जवळच्या व सोयीच्या सेंटरमध्ये जाऊन नावनोंदणी करणे आवश्‍यक असून, शाळा व मॉल्सच्या वेळा वेगवेगळ्या आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com