इतिहास चुकीच्या पद्धतीने समाजासमोर आल्यास समाजात मानसिक बदल- प्रा.भैलुमे

रमेश मोरे
बुधवार, 13 जून 2018

जुनी सांगवी - इतिहास चुकीच्या पद्धतीने समोर आल्यास समाजाच्या मानसिकेतवर परिणाम होतो. या परिणामांच्या बदलामुळे समाजाची वैचारिक मतं बदलतात. म्हणुन खरा इतिहास समाजासमोर मांडला पाहिजे असे दापोडी येथे  छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात इतिहास अभ्यासक प्रा.राजाभाऊ भैलुमे यांनी व्यक्त केले. 

ते बोलताना पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांचे कुठल्याही धर्माविषयी वैर नव्हते.तर केवळ स्वराज्यासाठी राजकीय वैर होते. मात्र अनेकांनी शिवाजी महाराजांना मुस्लिम विरोधी भासवुन सामाजिक राजकीय स्वार्थापोटी उपयोग करून घेतला.समाजात आज परिवर्तन होताना दिसत आहे. संयुक्त जयंती महोत्सव साजरा होणे हा समाजात वैचारिक, मानसिक झालेला बदल आहे. बदल अंगिकारणे ही एकसंघ समाजाची गरज आहे. दापोडी येथील जलसंपदा विभाग कर्मचारी, शिवप्रेमी मित्र मंडळ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने मंगळवार ता.१२ संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 

सकाळी येथील नरवीर तानाजी पुतळा चौक ते यांत्रिकी कार्यशाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन श्री पुंडलिक थोटवे अधिक्षक अभियंता जलसंपदा विभाग हे उपस्थित होते. 

तर श्री.एम.एम.मोरे अधिक्षक अभियंता नाशिक, श्री.व्ही.एम.गायकवाड अभियंता आरोग्य विभाग पुणे, श्री.मि.स.जिवणे अभियंता कोल्हापुर, आमदार गौतम चाबुकस्वार, नगरसेवक राजाभाऊ बनसोडे, रोहित काटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रविण धिवार यांनी केले तर आभार कैलास पवार यांनी मानले.

Web Title: by presenting History of the society in the wrong way, mental retardation in society

टॅग्स