वाघोलीत कचऱ्याची समस्या गंभीर

wagholi
wagholi

वाघोली (पुणे) : वाघोलीतील सध्याच्या कचरा डेपोत कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे काम सुरू असल्याने कचरा टाकण्यास जागा नाही. यामुळे काही ठिकाणचा कचरा तसाच पडून आहे. कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्याही बंद करण्यात आल्याने घरातच कचरा साठविण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ही समस्या लवकर सुटली नाही तर आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.

मागील महिनाभरापासून कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. कचरा उचलला ही जात नाही व घंटा गाड्याद्वारे गोळा ही केला जात नाही. यामुळे सार्वजनिक ठिकानाबरोबरच घरात ही कचऱ्याचे ढीग साचू लागले आहे. खाणीत कचरा टाकण्याच्या निर्णयाला विरोध झाल्याने यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. त्यामध्ये सध्याच्या कचरा डेपो परिसरातच कचरा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तेथील अतिक्रमणामुळे जागा नसल्याने तो टाकला जात नाही. काही ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या वॉर्डातील कचरा रात्रीच्या वेळी उचलून त्याची विल्हेवाट लावली. कचरा प्रकल्पाचे काम होण्यासाठी अजून किमान 10 ते 15 दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यावर प्रक्रिया सुरू होईल. तो पर्यंत कचरा उचलण्याची व घंटा गाड्या सुरू करण्याची गरज आहे. शुक्रवारी कचरा प्रश्नावर ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र 18 पैकी नऊ सदस्य अनुपस्तीत होते. लोहगाव रोड परिसरातील सोसायटी धारकांनी कचरा पेटत असल्याने त्याचा त्रास होत असल्याची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली होती.

कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या युनिटचे काम चार पाच दिवसात होईल. त्यावर प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कचऱ्याची समस्या सुटेल. 
- मधुकर दाते, ग्रामविकास अधिकारी.      

शुक्रवारी कचरा समस्या बाबत सदस्यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. नऊ सदस्य उपस्तीत राहिले नाही. मग अशा प्रश्नावर निर्णय कसा घ्यायचा. दोन दिवसात कचरा उचलून तो साठवण्याची व्यवस्था करू. 
- वसुंधरा उबाळे , सरपंच, वाघोली

युनिटचे काम सुरू करण्यापूर्वीच कचरा कुठे साठवायचा कुठे याचे नियोजन होणे गरजेचे होते. 
- नागरिक

तातडीच्या बैठकीला सदस्य आपल्या कामामुळे उपस्तीत राहू शकले नाही. सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे. 
- संदीप सातव, उपसरपंच, वाघोली.

कचरा प्रश्नी आयोजित विशेष ग्रामसभेपुर्वी सदस्यांच्या बैठकीचे याच प्रश्नासाठी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळीही हे सदस्य उपस्थित नव्हते. शुक्रवारी ही त्यांनी दांडी मारली. सदस्यांचे हे राजकारण नागरिकांसाठी घातक ठरू नये हीच अपेक्षा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com