'यंग इंडिया'साठी प्राध्यापकांचीच उपस्थिती

young india .jpg
young india .jpg

पुणे : तरुणांमध्ये खेळाचे महत्त्व वाढावे, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने "मिशन यंग अँड फिट इंडिया' मोहीम सुरू केली. या मोहिमेचे उद्‌घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या हस्ते करण्यात आले. "यंग इंडिया'साठी असणाऱ्या या मोहिमेच्या उद्‌घाटनप्रसंगी प्राधान्याने उपस्थिती होती ती "ओल्ड इंडिया'ची. त्यामुळे सचिनला भेटण्या-ऐकण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तरुणाईची निराशा झाली. 

विद्यापीठातर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठांचे कुलगुरू, विद्यापीठाच्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, शिक्षण संस्थाचालक आणि संचालक, विभागप्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक-शिक्षक यांना निमंत्रित केले होते. तरुणांसाठी असणाऱ्या या मोहिमेच्या उद्‌घाटनप्रसंगी सभागृहात साधारणतः 10 टक्के तरुण उपस्थित होते. त्यामुळे तरुणांना कार्यक्रमापासून डावलण्यात आल्याची चर्चा विद्यापीठ परिसरात सुरू झाली होती. 
याविषयी विचारले असता, विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दीपक माने म्हणाले, ""ही मोहीम सचिन तेंडुलकर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे. मोहिमेची आखणी करताना त्यांच्याशी चर्चा केली होती. त्या वेळी तेंडुलकर यांनीच ही मोहीम आपल्याला शाळा, महाविद्यालयांमध्ये राबवायची आहे. त्यामुळे मोहिमेची अंमलबजावणी करणाऱ्यांशी संवाद साधायचा आहे, असे मत व्यक्त केले होते. त्यानुसार विद्यापीठाने मोहिमेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या घटकांतील मान्यवरांना निमंत्रित केले होते.'' 

कर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शवली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात उपचार करणे शक्य नाही. सीझरच करावे लागेल, त्यामुळे तुम्ही तात्काळ मालेगावला जा, आम्ही रुग्णवाहिका देतो. बाहेर बाकावर बसा. असे सांगून गरोदर महिलेस तब्बल तीन तास बाहेर बसवून ठेवले. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी व चालक हजर नसल्यामुळे त्या महिलेला ताटकळत उन्हातान्हात बसावे लागले. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका आल्यानंतर त्या महिलेच्या नातेवाईकांनी मालेगाव येथील सामान्य रुग्णालय गाठले. तेथे दाखल होताच सीझर करावे लागणाऱ्या गरोदर महिलेची सुरळीत नैसर्गिक प्रसूती झाली. त्यामुळे नातेवाईकांच्या मनात ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभाराबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. 
असे प्रकार ग्रामीण रुग्णालयात वारंवार घडत असल्याने सामान्य रुग्णांची फरफट होत आहे. रुग्ण आपल्याकडे आले की वैद्यकीय अधीक्षक व अधिकाऱ्यांकडून विविध कारणे सांगून रुग्णांना खाजगी रुग्णालय अथवा मालेगाव, कळवण, नाशिक येथे जाण्यास सांगण्यात येते. रुग्णालयात श्वान व सर्पदंशावर आवश्यक त्या लसी उपलब्ध नाहीत तसेच स्त्रीरोगतज्ञ व सिजरीयनची देखील सोय नाही. एक्सरे सुविधा, शस्त्रक्रिया कक्ष नाही. कर्मचाऱ्यांकडून आलेल्या रुग्णांना हीन वागणूक दिली जाते. सटाणा ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील जनतेला उपचारांसाठी महत्वाचे ठिकाण आहे. मात्र येथील असुविधा व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे हे रुग्णालय असून नसल्यासारखे झालेले आहे.  

या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बागलाण तालुका अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांतीदल व एकलव्य संघटनेने आज काळ्या फिती लावत ग्रामीण रुग्णालयावर घोषणाबाजी करत मोर्चा काढला. यावेळी तहसील विभागातील लिपिक सागर रोकडे व वैद्यकीय अधिकारी एन.एस.बांगर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात भाऊसिंग पवार, प्रभाकर पवार, नामदेव बोरसे, राजेंद्र सावकार, नानाजी पवार, त्र्यंबक गांगुर्डे, भारत सोनवणे, अनिल पिंपळसे, प्रभाकर रौंदळ, नंदू बोरसे, अर्जुन जाधव, किशोर बोराळे, सुरेश पवार, लक्ष्मण बोरसे, अशोक ठाकरे, भीमा गवळी, कमलाबाई गांगुर्डे, बिबाबाई दळवी, निंबाबाई माळी, मीराबाई माळी, सुमनबाई पिंपळसे आदींसह आदिवासी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com