करवसुली होत नसेल, तर मिळकती जप्त करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

पुणे - मार्चअखेर मिळकत कर वसुलीचे उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी तसेच विकासकामांना गती मिळण्यासाठी कर वसूल होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्व नगर परिषद प्रशासनाने कर वसुलीवर भर द्यावा. करवसुली होत नसेल, तर नगर परिषद हद्दीतील रोज किमान दहा मिळकती जप्त करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या आहेत.

पुणे जिल्ह्यात 13 नगर परिषदा आहेत. या नगर परिषदांच्या हद्दीतील मिळकत कर वसुलीबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदांच्या नगराध्यक्षांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय कौन्सिल हॉल येथे पार पडली. त्या वेळी या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील जेजुरी, भोर, इंदापूर, दौंड, या नगर परिषदांच्या हद्दीमध्ये इतर नगर परिषदांच्या मानाने अतिशय कमी कर वसूल झाला आहे. या नगर परिषदांच्या हद्दीतील कर शंभर टक्के वसूल होण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जोरदार प्रयत्न करणे अतिशय आवश्‍यक आहे.

ज्या नगर परिषदांचा कर सर्वांत कमी वसूल झाला आहे, त्या ठिकाणी खासगी संस्थेमार्फत कर वसूल करण्यात यावा, अशाही सूचना जिल्हाधिकारी राव यांनी या वेळी दिल्या.