कैद्यांना आता वीजवाहिन्यांची वेसण

दिलीप कुऱ्हाडे
बुधवार, 30 मे 2018

पुणे - राज्यातील ४७ कारागृहांच्या सीमाभिंतीवर आता प्रवाहित वीजवाहिन्यांचे कुंपण करण्याचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने राज्य व केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्यामुळे पळून जाणाऱ्या कैद्यांना विजेचा शॉक बसल्याशिवाय राहणार नाही. वीजवाहिन्यांचे कुंपण बसविण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने तयार केला आहे. याला कारागृहाचे महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दुजोरा दिला आहे.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील ४७, तर नऊ मध्यवर्ती कारागृहे आहेत. या कारागृहांच्या आधुनिकरणाच्या टप्प्यात सर्वच कारागृहांच्या सीमाभिंतीवर प्रवाहित वीजवाहिन्यांचे कुंपण बसविण्यात येणार आहे. त्यामुळे कैद्यांना पळून जाणे अशक्‍य होणार आहे. राज्यात सध्या ३० हजारांपेक्षा अधिक कैदी संख्या आहे. मात्र तुरुंग रक्षकांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनाला आहे त्या मनुष्यबळावर कैद्यांवर लक्ष ठेवावे लागत आहे. कैदी पळून गेल्यास संबंधित तुरुंग रक्षक व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होते. हे टाळण्यासाठी व कमी मनुष्यबळावर कारागृहातील कैद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष आहे. आता सीमाभिंतीवरच प्रवाहित वीजवाहिन्या बसविल्यामुळे कैदी पळून जाणार नाहीत.

राज्यातील सर्वच कारागृहांच्या सीमाभिंतीवर प्रवाहित वीजवाहिन्यांचे कुंपण बसविण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून निधीची मंजुरी मिळताच हे काम राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडून करण्यात येणार आहे. 
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, कारागृह महानिरीक्षक

Web Title: the proposal for the flow of streamed electricity channels on the boundary wall of 47 jails in the state