ओझरला बिबट जनजागृती अभियान राबविण्यात आले 

दत्ता म्हसकर
मंगळवार, 31 जुलै 2018

जुन्नर - अष्टविनायक श्री क्षेत्र ओझर ता.जुन्नर येथे अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून परिसरातील तसेच राज्याच्या विविध भागातून आलेल्या गणेश भक्तांसाठी बिबट जनजागृती अभियान राबविण्यात आले.

जुन्नर - अष्टविनायक श्री क्षेत्र ओझर ता.जुन्नर येथे अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून परिसरातील तसेच राज्याच्या विविध भागातून आलेल्या गणेश भक्तांसाठी बिबट जनजागृती अभियान राबविण्यात आले.

बिबट जनजागृती करण्यासाठी नेहमीच सज्ज असलेली माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पथक व वन विभाग जुन्नर यांनी या उपक्रमाचे आज आयोजन केले होते. श्री गणेशाच्या दर्शनासाठी जवळपासच्या गावातील तसेच परगावाहून आलेले भाविक व ग्रामस्थ यांना बिबट्या पासुन स्वसंरक्षण कसे करावे या बाबत मार्गदर्शन करून मानव-बिबट संघर्ष कमी व्हावा व मानव- बिबट सहजीवन घडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. माहिती पत्रके वाटण्यात आली. संवाद साधण्यात आला तसेच वृक्षारोपण करण्यासठी रोपे देखील देण्यात आली.

यावेळी जुन्नरचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, सहायक उपवनसंरक्षक युवराज मोहिते, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अजय देशमुख, सहायक पशुवैद्यकीय अधिकारी महेंद्र ढोरे, वनपाल मनीषा काळे, वनरक्षक कांचन ढोमसे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: A public awareness campaign was implemented in Ojhar