पोषण अभियानाअंतर्गत लोकचळवळ; महिला व बालकल्याण विभागाचे उपक्रम

Public movement under Nutrition Campaign of Women and Child Welfare Department activities
Public movement under Nutrition Campaign of Women and Child Welfare Department activities

चिमूर - शुन्य ते सहा वयोगटातील बालकांची निकोप वाढ व्हावी कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, बालक, किशोरी आणि महिलांच्या रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे, जन्मतः वजन कमी असण्याचे प्रमाण कमी करणे इत्यादी करीता आरोग्यदायी व सुक्ष्म पोषणाकरीता महिला व बालकल्याण विभागाद्वारे पोषण अभियानाअंतर्गत लोकचळवळीकरीता महिनाभर जागर करण्यात येणार आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत संपुर्ण सप्टेंबर महिन्याभर पोषण महिना घोषित करून या संपूर्ण महिन्यात पोषण आहाराविषयी जनजागृती करून याला लोकचळवळीचे स्वरूप देण्याकरीता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाकरीता ० ते ६ वयोगटातील बालकांमधील खुजे / बुटके पणाचे तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, ६ ते ५९ महिने वयोगटातील बालकांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे, १५ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुली / महिला यांचेमधील रक्तक्षय कमी करणे, जन्मतः कमी वजनाचे असणारे बालकांचे प्रमाण कमी करणे ही चार उदिष्टे ठेवण्यात आली आहेत.

बालके, किशोरी, माता, स्तनादा माता, गरोधर महिला तथा ग्रामस्थ यांचे करीता ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आणी आरोग्य विभागाद्वारे जागर करण्यात येणार आहे. ज्यामध्ये पोषणाविषयी चित्रफीत दाखविणे, प्रभातफेरी, बालकांचे स्क्रिनिंग, आरोग्य केंद्रावर कार्यशाळा, औषधे वाटप, स्तनपान व शिशुपोषणाबाबत ग्रहभेटी देऊन मार्गदर्शन करणे, किशोरींना मार्गदर्शन, बेटी बचाव बेटी पढाव तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनांचे प्रचार आणि प्रसिद्धी, सुपोषण दिवस साजरा करणे, व्ही सी डी सी चा शुभारंभ आणि ग्राम आरोग्य व स्वच्छता पोषण दिवस इत्यादीच्या माध्यमातून जाणीव जागृती सर्व नागरीक, प्रतिष्ठीत, लोकप्रतिधी यांच्या सहभागाने करण्यात येत असल्याची माहिती एकात्मीक बालविकास सेवा योजना प्रकल्प चिमूरच्या वतीने विस्तार अधिकारी प्रमोद जोनमवार यांनी दिली.

सुदृढ व आरोग्य सम्पन्न समाज निर्मीती करीता वैयक्तिक व परीसर स्वच्छतेसोबतच आरोग्यदायी व सुक्ष्म पोषण मुल्य असलेले आहाराविषयी जाणीव जागृती होणे गरजेचे असून याकरीता लोकचळवळीची गरज असल्याने प्रत्येकाने या अभियानात सहभागी व्हावे. - उमेश मुदखेळे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, चिमूर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com