पुणे: उरुळी कांचनजवळ अपघातात 11 भाविक ठार

जनार्दन दांडगे
शनिवार, 11 मार्च 2017

विजय काळे, ज्योती काळे, योगेश लोखंडे, जयवंत चव्हाण, योगिता चव्हाण, रेवती चव्हाण, जयदिश पंडीत, शैलजा पंडीत, सुलभा अवचट यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

पुणे - पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनजवळ आज (शनिवार) पहाटे अक्कलकोटला दर्शनासाठी जात असलेल्या मिनी बस कंटेनरवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात अकरा भाविक जागीच ठार झाले असून, काही जण जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोटला निघालेली मिनी बस कंटेनरवर आदळल्याने हा अपघात झाला.  हा अपघात पहाटे साडेचार वाजता झाला. अपघातग्रस्त बस हि वाशी परीसरातील असून, मृतांमध्ये नारायणगाव व ओतूर परिसरातील नागरिक असणाची शक्यता आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या ड़ुकराला वाचविण्याच्या प्रयत्नात मिनी बस रस्ता दुभाजक ओलांडून विरूद्ध बाजूने जाणाऱ्या कंटेनरवर आदळली. 

मृतांमध्ये पाच महिला, पाच पुरूष व एका लहान मुलीचा समावेश आहे. विजय काळे, ज्योती काळे, योगेश लोखंडे, जयवंत चव्हाण, योगिता चव्हाण, रेवती चव्हाण, जयदिश पंडीत, शैलजा पंडीत, सुलभा अवचट यांचा मृतांमध्ये समावेश आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत.

Web Title: Pune: 11 pilgrims killed in road accident on Pune-Solapur highway