संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद 

nowater
nowater

पुणे - शहरातील सर्व जल केंद्रांमध्ये देखभाल-दुरुस्तीची कामे होणार असल्यामुळे येत्या गुरुवारी (ता. 5) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे. याची नोंद घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. 

गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणारा भाग : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, सहकारनगर, पर्वती गाव, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्‍वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं 42, 46 (कोंढवा खुर्द), तसेच हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, दत्तनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, तसेच चतुःशृंगी, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक परिसर, किष्किंदानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलना, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा परिसर, गुरू गणेशनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धकरणाचा परिसर, सुस, सुतारवाडी, भूगाव रोड परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

लष्कर भागातील, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी आदी परिसरातील, तसेच विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे पर्वती टॅंकर आणि पद्मावती टॅंकर भरणा केंद्रातील कामकाजही गुरुवारी बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com