पुणे: कोंढव्यात संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

ज्योत्स्ना ही बंगळूर येथील एका कंपनीत कामाला होती. ती आईला भेटण्यासाठी आली होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत.

पुणे - कोंढवा परिसरात आज (बुधवार) सकाळी एका संगणक अभियंता तरुणीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्योत्स्ना गांधी (वय 23 रा. शांतीनगर सोसायटी, कोंढवा बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ज्योत्स्नाच्या आईचे ऑपरेशन झाले होते. त्यासाठी म्हणून ती आईला भेटायला पुण्यात आली होती. आईला भेटल्यानंतर ज्योत्स्ना तिच्या मित्राला भेटण्यासाठी म्हणून सुमा सिल्वर या इमारतीमध्ये गेली होती. याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन तीने उडी मारुन आत्महत्या केली.

ज्योत्स्ना ही बंगळूर येथील एका कंपनीत कामाला होती. ती आईला भेटण्यासाठी आली होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत.