पुण्याच्या विकासाला गती : पालकमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

पुणे : 'सबका साथ, सबका विकास' याप्रमाणे सर्व घटकांचा समतोल विचार करत आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला. विशेषतः स्मार्ट सिटी, पुणे मेट्रो, जायका प्रकल्प आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून भरीव तरतूद केली. यामुळे पुण्याच्या विकासाला आणखी गती प्राप्त होईल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला. 

राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना बापट म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरांचा विकास करण्यासाठी सोळाशे कोटींची भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याचा फायदा निश्‍चितपणे पुण्याच्या विकासाला होईल. जायका प्रकल्पाचा प्राधान्याने यात विचार करण्यात आला असून, यासाठी शंभर कोटींचे अर्थसाहाय्य केंद्राकडून येणे अपेक्षित आहे. राज्यातील मुंबई, पुणे व नागपूर येथे कार्यान्वित झालेल्या मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासाठी 710 कोटी रुपयांचा निधी दिल्याने पुणे मेट्रोला गती प्राप्त होईल. येत्या काळात राज्य सरकार 35 कंपन्यांबरोबर करार करणार आहे. 

प्रामुख्याने चाकण, भोसरी, रांजणगाव आदी भागातील एमआयडीसीच्या विकासासाठी याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

अन्न व नागरीपुरवठा विभागासंदर्भातील तरतुदीविषयी ते म्हणाले, ''सार्वजनिक वितरण व्यवस्था आणखी सक्षम करण्यासाठी नवीन गोदामे बांधण्यासाठी 80 कोटी निधीची तरतूद अर्थमंत्र्यांनी केली असून, यामुळे शासकीय गोदामांची संख्या आता बाराशे होईल. याप्रमाणेच सार्वजनिक वितरण व्यवस्था अद्ययावत व संगणकीकृत करण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे आम्ही मागणी केली होती, याची आवर्जून दखल घेत त्यांनी यासाठी आवश्‍यक तो निधी देण्याचे जाहीर केले. यामुळे आता राज्यातील 52 हजार स्वस्त धान्य दुकानात ई पॉस मशिन बसविण्यात येईल. त्यामुळे रोख विरहित व्यवहारांनाही चालना मिळणार आहे.''

Web Title: Pune development to get boost, says Girish Bapat