मुख्यमंत्र्यांची पुण्यातील सभा गर्दीअभावी रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (शनिवार) दुपारी दोन वाजता न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात होणारी सभा गर्दी अभावी रद्द करावी लागली. मुख्यमंत्र्यांनी समन्वयाअभावी सभा रद्द केल्याचे ट्विट केले आहे.

फडणवीस यांची सभा टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. सभेबाबात विविध दैनिकांमध्ये बातम्या व जाहिरातीही प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु, सभेला पुणेकरांनी पाठ फिरविल्याने सभा अखेर रद्द करण्यात आली. मुख्यमंत्री भाषण न करताच पिंपरीला रवाना झाले.

मुख्यमंत्र्यांच्या सभेला राज्यभरात गर्दी पहायला मिळते. परंतु, पुण्यात वेगळेच चित्र पहायला मिळाले. फडणवीस घटनास्थळी झाले होते. परंतु, व्यासपिठासमोरील खुर्च्या रिकाम्याच होत्या. समोर गर्दीच नसल्याने मुख्यमंत्री व्यासपीठावर गेलेच नाहीत. यावेळी व्यासपीठावर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट व भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना गर्दी अभावी सभा सोडून जाण्याची नामुष्की ओढावली.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सभा रद्द झाल्याचे ट्विट केल्यानंतर, सोशल साईट्सवर विनोदांचा पाऊस सुरु झाला. नेटिझन्सनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.

पुणे

खडकवासला : धरण क्षेत्रात रविवारी सकाळी विक्रमी पाऊस पडला असून, 24 तासात 60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पानशेत धरण 100 टक्के...

10.48 AM

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत दरवर्षी प्रमाणे पालिका प्रशासनाकडुन गणपती उत्सवासाठी चोख...

10.03 AM

बारामती : 'राज्यात पाऊस होण्यासंबंधीचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरल्यास तोंडात...

09.45 AM