पुणेः खाद्यतेल आणखी महागणार

आघाडीच्या पामतेल उत्पादक इंडोनेशियाकडून निर्यातबंदी
Food Oil
Food OilSakal

पुणेः मागील वर्षभरापासून खाद्यतेल दरवाढीचा मार सोसणाऱ्या ग्राहकांना आणखी एकदा दरवाढीचा झटका बसणार आहे. भाराताचा मुख्य पामतेल पुरवठादार असलेल्या इंडोनेशियाने निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला. आधीच रशिया-युक्रेन युद्धामुळे सुर्यफूल तेलाचा पुरवठा कमी होऊन तेलांचे दर गगणाला भीडले. त्यातच आता पामतेलाचीही टंचाई भासणार आहे. त्यामुळे महागाईने आधीच कंबरडे मोडलेल्या ग्राहकांच्या पाठीवर ही दरवाढ लादली जाणार आहे. तर सामान्यांच्या आर्थिक बजेटला यामुळे भगदाड पडणार आहे.

भारत जगात सर्वांत मोठा खाद्यतेल आयातदार आहे. भारताने मागील वर्षात १३३ लाख टन खाद्यतेल आयात केली. त्यात ८३ लाख टन पामतेलाचा समावेश होता. तर ५० लाख टन इतर खाद्यतेलांची आयात झाली. म्हणेजच एकूण आयातीत पामतेलाचा वाटा ६२ टक्के होता. भारताला पामतेलाचा सर्वाधिक पुरवठा करणारा देश म्हणजेच इंडोनेशिया. इंडोनेशियातून जवळपास निम्मे म्हणजेच ४० ते ४५ लाख टनांच्या दरम्यान पामतेल आयात होते. त्यानंतर मलेशियातून ३८ लाख टन पामतेल येते. त्यानंतर थायलंडमधूनही काही प्रमाणात आयात होते.

मात्र खाद्यतेल महागाई आणि लोकांचा रोष बघता इंडोनेशिया सरकारने २८ एप्रिलपासून पामतेल निर्यातबंदीचा निर्णय घेतला. इंडोनेशियात मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाची मोठी टंचाई भासत आहे. खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले. असे असताहाी लोकांना खाद्यतेलासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. या रांगांमध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याच्याही बातम्या आल्या. महागाई प्रचंड वाढल्याने येथील नागरिकांच्या मनात अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता कमी करण्यासाटी राष्ट्रपती विडोडो यांनी पुढील सूचना येईपर्यंत खाद्यतेल निर्यात बंद केली. रशिया-युक्रेन युद्धामुळे आधीच सूर्यफूल तेल पुरवठा ठप्प होऊन पामतेलासह सोयाबीन तेलाचे दर वाढले आहेत. त्यातच इंडोनेशियाच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल दरवाढीचा भडका उडेल.

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम थेट भारतातील दरावरही होईल. कारण हा भारातासाठी दुसरा झटका असेल. कारण आधीच रशिया-युक्रेन युद्धामुळे सुर्यफूल तेल आयात ठप्प झाली. त्यातच आता इंडोनेशियाने पामतेल निर्यात बंद केली. त्यामुळे देशात खाद्यतेलाचा तुटवडा आणखी वाढू शकतो. परिणामी खाद्यतेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या बजेटवर होईल. आधीच महागाईमध्ये होरपळणाऱ्या नागरिकांवर खाद्यतेल दरवाढीचे हे नवे संकट असेल, असे जाणकारांनी सांगितले.

आपण सर्वाधिक खाद्यतेल इंडोनेशियातून आयात करतो. आधीच रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफुल तेल आयात ठप्प झाली. आता इंडोनेशियाच्या या निर्णयामुळे भारताला दुहेरी फटका बसणार आहे. यामुळे देशात खाद्यतेलाचे दर आणखी वाढू शकतात.

- अजय केडिया, संचालक, केडिया अॅडव्हायजरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com