भोंडवेवाडीत शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

सुपे - भोंडवेवाडी (ता. बारामती) येथील हनुमंत पांडुरंग शिंदे (वय ४८) या शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. कर्जाला  कंटाळून आत्महत्या करण्याची गेल्या दीड महिन्यात तालुक्‍यातील ही चौथी घटना आहे.

या घटनेची माहिती हनुमंत शिंदे यांचे बंधू सुनील पांडुरंग शिंदे यांनी पोलिसांना दिली. मध्यरात्री दीडच्या सुमारास शिंदे यांच्या मुलीला जाग आली, तेव्हा शिंदे घरात नव्हते. त्यांचा शोध घेतला असता, जवळच असलेल्या दीपक भोंडवे यांच्या शेतात ते मृतावस्थेत आढळून आले. शेतीकर्ज व मुलीच्या लग्नाविषयी गेल्या आठवड्यात बंधूंनी चर्चा केल्याचे खबरीत म्हटले आहे. 

शिंदे अत्यल्पभूधारक शेतकरी असून, त्यांची दोन एकर शेती आहे. या शेतीसाठी भोंडवेवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेकडून व येथील बचत गटाकडून कर्ज घेतले आहे.

सुप्रिया सुळे यांच्याकडून सांत्वन
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी सुप्यातील ग्रामीण रुग्णालयात शिंदे यांच्या नातेवाइकांची भेट घेऊन सांत्वन केले. मुलींच्या शिक्षणाची काळजी करू नका, असे सांगून धीर दिला. सरकारने तातडीने शेतीकर्ज माफीचा निर्णय घेऊन शेतमालाला हमीभाव देण्याची गरज व्यक्त केली.

पुणे

नवरात्र उत्सव आजपासून (गूरूवार) सुरू होत आहे. देवीजवळ घटस्थापना करून कुलदैवतांचा जागर केला जाणार आहे. नवचंडिकेचे नऊ दिवस उपवास...

04.27 PM

नवी सांगवी : पिंपळे गुरव मध्ये गोळीबार झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ लल्या...

11.18 AM

नवी सांगवी : "ऐन पावसाळ्यात पिंपळे गुरव परिसरातील कचरा कुंड्या ओसंडून वाहत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण...

11.06 AM