पुणे फेस्टिव्हल शुक्रवारपासून

Hemamalini
Hemamalini

पुणे - पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदा शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, नाट्य, सूफी संगीताच्या मैफलीसह दिवंगत कवी गदिमा, गायक सुधीर फडके आणि साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘स्वरांजली’ एवढेच काय, तर बंगाल महोत्सव, भांगडा, पंजाबी, गुजराथी आणि महाराष्ट्रीय नृत्याविष्कारासहीत चित्रकला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांच्या हस्ते येत्या १४ सप्टेंबरला फेस्टिव्हलचे उद्‌घाटन होईल, अशी माहिती फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी आज येथे दिली. 

फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल उपस्थित होते. कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहारी संगम असलेल्या या फेस्टिव्हलच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी साडेचार वाजता होईल. पालकमंत्री गिरीश बापट, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, समाजकल्याण राज्यमंत्री दिलिप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुहास दिवसे उपस्थित राहणार आहेत. 

त्याआधी १३ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता हॉटेल सारस येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट एअर मार्शल ओ. पी. विपिन यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होईल. या वेळी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, अभिनेत्री प्राजक्ता माळी, श्रद्धा कक्कड उपस्थित राहणार आहेत. या वेळी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, श्रीनिवास पाटील, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंत गायकवाड, अभिनेते विक्रम गोखले यांना गौरविण्यात येणार आहे. शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर मंडळाचाही गौरव करण्यात येईल. महिला कलाकारांचे ‘पोवाडा फ्युजन’ हे उद्‌घाटन सोहळ्याचे आकर्षण असेल.

एकांकिका, हास्योत्सव एकपात्री
ट्रीब्युट टू बॉलिवूड म्युझिक लिजंड्‌स, सुफी संगीत दरबार, हिंदी हास्य कवी संमेलन, जश्‍न ए हुस्न, गोल्डन एरा ऑफ म्युझिक, मिस पुणे फेस्टिव्हल यांसह पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील विजेत्या एकांकिका, हास्योत्सव एकपात्री यांसारखे विविध कार्यक्रम होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com